Easy Ice-Cream Recipes: उन्हाळ्याचा हंगाम म्हटंले की, प्रत्येकालाच थंडगार पदार्थ खायला आवडतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. आईस्क्रीम न आवडणारी व्यक्ती सापडणे म्हणजे दुर्मिळच. आईस्क्रीम हा असा पदार्थ आहे जो कितीही खाल्ला तरी पोट भरते पण मन मात्र काही भरत नाही. आईसक्रीम म्हणजे अनेकांचा विक पाईंट. चला जाणून घेऊया सोप्या पद्धतीने घरच्या-घरी आइस्क्रीम कशी तयार करायची.
पीनट बटर आइस्क्रीम साहित्य –
- 2 कप डेअरी दूध
- ४ ते ५ चमचे साखर
- १/२ कप पीनट बटर
- १/४ टीस्पून मीठ
- १/२ टीस्पून शुद्ध व्हॅनिला अर्क
- तुमच्या आवडीनुसार टॉपिंग
पीनट बटर आइस्क्रीम कृती –
- सर्व साहित्य नीट ढवळून झाल्यावर हे मिश्रण आइस क्यूब ट्रेमध्ये ओता.
- मिश्रण तासभर फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर, बर्फाच्या ट्रेमधून ते काढा आणि एका बाउलमध्ये मिश्रण काढून व्यवस्थित ढवळा
- पूर्णपणे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा,बाहेर काढा आणि हँड बीटरच्या मदतीने फेटून परत फ्रीजमध्ये ठेवा
- त्यानंतर मिश्रण ३० मिनिटांपर्यंत फ्रीझरमध्ये सेट करा.
- ३० मिनिटांनंतर आईस्क्रीममध्ये चॉकलेट सिरप आणि चॉकलेट चिप्स घाला.
तुटी फ्रूटी आईस्क्रीम साहित्य –
- 3 कप व्हॅनिला आइस्क्रीम
- आपल्या आवडीचे 3 चमचे जाम
- एक बाउल कापलेली फळं आणि साखऱ
- बारीक केलेले काजू, बदाम
- गार्निशींगसाठी व्हीप क्रीम
तुटी फ्रूटी आईस्क्रीम कृती –
- एका बाउलमध्ये कापलेली फळे टाका
- त्यावर एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम टाका
- आईस्क्रीममध्ये १ चमचा जाम आणि बारीक केलेले काजू, बदाम घाला
- आता पुन्हा यावर दोन स्कूप आइस्क्रीम घाला
- सर्व्ह केल्यानंतर वरती व्हीप्ड क्रिमनं डिजाईन करु शकता.
विशेष म्हणजे ही घरी केलेली आइस्क्रीम खाल्ल्याने आपले मुले आजारीही पडणार नाहीत. कारण या आइस्क्रीमसाठी आपण सर्वच घरगुती साहित्य वापरले आहे.