How To Make Batayacha Paratha : बटाटा हा अनेकांचा आवडता आज. कोणती भाजी करायची हे सुचले नाही की, पटकन बटाटा वापरून वेळ वाचवता येतो. बटाट्याच्या काचऱ्या, बटाटे वडे, पापड, कीस, चकल्या, ठेचा, कधी भाताबरोबर डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर पटकन बटाटा आणि चार मसाले घालून पुलाव करता येतो. त्याचबरोबर बटाट्याचे पराठे (Batata Partha) सुद्धा चविष्ट लागतात. पण, अनेकदा पराठे करताना किंवा लाटताना एकत्र आपल्याकडून पोळी फाटते किंवा पोळीत भरलेली भाजी बाहेर पडते. तर यासगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एका युजरने बटाट्याचे पराठे बनवण्याची एक खास रेसिपी सांगितली आहे, ज्यामुळे तुम्हाला पराठे बनवताना कोणतीच समस्या येणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

  • तीन बटाटे
  • एक कांदा
  • एक चमचा आलं-लसूण पेस्ट
  • हळद एक ते दीड चमचा
  • एक चमचा धणे पावडर
  • एक चमचा तिखट मसाला
  • हिंग
  • मीठ
  • क्रश मसाला (ज्यामध्ये धणे+जीरा+ओवा +लवंग +काळी मिरी +कलौंजी)
  • एक चमचा कस्तुरी मेथी
  • कोथिंबीर
  • पाणी

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

  • एका बाऊलमध्ये तीन बटाटे, एक कांदा, आलं-लसूण पेस्ट, हळद, धणे पावडर, तिखट मसाला, हिंग, मीठ, क्रश मसाला (ज्यामध्ये धणे+जीरा+ओवा +लवंग +काळी मिरी +कलौंजी), एक चमचा कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घ्या आणि पाणी टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात एक चमचा गव्हाचे पीठ घाला.
  • नंतर त्यात पाणी घाला आणि पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या.
  • त्यानंतर मिश्रण ५ ते ७ मिनिटे असेच ठेवून द्या.
  • गॅसवर पॅन ठेवा. त्यात तेल घाला आणि बॅटर तव्यावर पसरवून घ्या. दोन्ही भाजून पराठा व्यवस्थित शिजला आहे का पाहा आणि मग गॅस बंद करा.
  • तर अशाप्रकारे तुमचा बटाटयाच्या पराठा (Batata Partha) तयार.
  • तुम्ही सॉस, दही बरोबर हा पराठा खाऊ शकता.

बटाट्याचे आरोग्यदायी फायदे (Batata Partha)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि ही रेसिपी @desi_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ऑफिसवरून किंवा शाळेतून आल्यावर खूप भूक लागली असेल तर तुम्ही हा पदार्थ झटपट बनवून खाऊ शकता. सकाळी नाश्त्याला किंवा ऑफिस किंवा शाळेत जाणाऱ्या मंडळींसाठी तुम्ही हा खास पराठा डब्यातून देऊ शकता. तर तुम्ही सुद्धा पराठे बनवण्याची ही सोपी रेसिपी वाचा आणि घरी एकदा नक्की ट्राय करून बघा…

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make easy style batata partha what is the recipe read in marathi asp