How To Make Egg Fry : अंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. अंड्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, फॉस्फोरस, सेलेनियम, कॅल्शियम, झिंक, हेल्दी फॅटसह अनेक आवश्यक तत्व असतात. यात ओमेगा ३ फॅटी ॲसिड असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात. तर मग आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी आपण अंड खाल्लं पाहिजे. पण, अंड्याचे तेचतेच पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण अंड्याची एक आगळीवेळी रेसिपी पाहणार आहोत. सोशल मीडियावर एका युजरने ही खास रेसिपी व्हिडीओत दाखवली आहे. या रेसीपीचे नाव अंडा फ्राय (How To Make Egg Fry) . तर आजच घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी.

साहित्य ( Egg Fry Recipe Ingredients):

१. पाच अंडी

son shouting at a mother in a railway Viral video on social media
मुलगा म्हणून अपयशी ठरला! रेल्वेत प्रवास करताना मुलाने आईबरोबर जे केलं ते पाहून व्हाल नि:शब्द, पाहा VIDEO
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
The viral video has received more than 20 million views
मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral
Farmers be careful while working in farms snake was hiding under the gras many snakes found in farm shocking video
शेतकऱ्यांनो सावधान! शेतात जरा जपून टाका पावलं; एक चूक पडेल भारी, VIDEO पाहून प्रत्येकाला फुटेल घाम
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

२. धणे

३. काळीमिरी

४. लाल मिरची

५. कडीपत्ता

६. बटर

७. हळद

८. मसाला

९. मीठ

१०. कोथिंबीर

हेही वाचा…Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Egg Fry) :

१. पाच अंडी उकडवून घ्या.

२. नंतर अंड्याचे पिवळ्या भागासह छोटे-छोटे काप करून घ्या.

३. पॅनमध्ये धणे, काळीमिरी, मिरी, लाल मिरची, कडीपत्ता भाजून घ्या.

४. त्यानंतर मिस्करमध्ये पावडर करून घ्या.

५. नंतर पॅनमध्ये बटर घाला.

६. नंतर अंड्यांचे काप एकेक करून त्यात ठेवा.

७. हळद, मसाला, मीठ घाला .

८. दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवून घ्या.

९. नंतर वरून कोथिंबीर घाला.

१०. अशाप्रकारे ‘अंडा फ्राय’ (Egg Fry) तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @ marathi_kadhai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही आतापर्यंत अंड्यांची बुर्जी, अंड्यांचे ऑमलेट, अंडा मसाला, अंड्याचे कटलेट, अंडा पाव आदी अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण, हा एक वेगळा आणि चविष्ट पदार्थ आहे. जो तुम्ही रविवारी आणि बुधवारी नाश्त्यासाठी करू शकता आणि कुटुंबातील सदस्यांना खायला देऊ शकता. तसेच हा पदार्थ पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल यात शंकाच नाही.