[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आई, आज मला नाश्त्याला वेगळं काहीतरी हवंय. रोज नूडल्स खाऊन कंटाळा आलाय!“ छोट्या बाळानं हट्ट चालवला होता. वडील समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण बाळ काही ऐकायला तयार नव्हतं. गेले काही दिवस हे प्रकार जरा वाढले होते. `अरे, आपल्याला नाही परवडणार अशी चैन!` हे वडिलांचं तत्त्वज्ञान काही त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. त्यानं भरपूर थयथयाट केला, धिंगाणा घातला. आता बाळ वडिलांच्याही हाताबाहेर जायला लागलं होतं. ह्याला वेगळं म्हणजे काय आणायचं, असा प्रश्न त्यांना पडला होता. बरं, बाळानं काही खाल्लं नाही, तर त्याच्या तब्येतीवर परिणाम होणार नाही, याचीही काळजी होतीच. “तुम्हीच लाडावून ठेवलंय त्याला. आज तुम्हीच निस्तरा त्याचे नखरे!“ असं आईनं फरमावल्यामुळं तिच्याकडे बाळाची जबाबदारी सोपवण्याचा मार्गही बंद झाला होता. `आम्ही लहान असताना आमच्या आईवडिलांकडे कधीही अशी तक्रार केली नाही. पानातून पडलेलं आम्ही निमूटपणे गिळायचो,` हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आता पुन्हा घासण्यात काही अर्थ नव्हता. बाळाचं कशानं समाधान होईल, याचा काही अंदाज येत नव्हता. वडिलांनी वेगवेगळे पर्याय सांगून पाहिले, पण बाळाला काहीच पसंत पडेना. पसंत पडले नाहीत, ते एका अर्थानं बरंच होतं. कारण त्याला आणून देणं तरी कुठे शक्य होतं? शेवटी अंड्याच्या पराठ्याचं नाव काढल्यावर बाळाचा चेहरा एकदम खुलला. `अंड्यात होता, तेव्हाच बरा होता. बाहेर आल्या दिवसापासून ह्याचे शंभर नखरे!` असं म्हणत आईनं नाकं मुरडून का होईना, एक अंडं आणून दिलं आणि वडिलांनी त्याचा छान अंड्याचा पराठा बनवला. कोंबडीचं पिल्लू तो खाऊन एकदम खूश झालं.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • २ वाट्या कणीक
  • मीठ
  • ४ टेबलस्पून मोहनासाठी वनस्पती तूप
  • आतील सारण
  • ३-४ अंडी
  • १ कांदा
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/२ चमचा गरम मसाला
  • मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • अंडी फोडून घ्यावीत.
  • थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा.
  • नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे.
  • अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे.
  • कोथिंबीर घालावी आणि थंड होऊ द्यावे.
  • लहान मुलांसाठी करताना मिश्रण थंड झाल्यावर आवडत असल्यास थोडे चीज किसून घालावे. पराठे आणखी पौष्टिक आणि चवदार होतील.
  • कणकेत मीठ आणि डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी.
  • १/२ तास पीठ झाकून ठेवावे.
  • नंतर त्याच्या दोन पुर्‍या लाटून घ्याव्यात. एकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरून त्यावर दुसरी पुरी ठेवावी.
  • कडा जुळवून घ्याव्यात आणि जरा लाटावे. नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी आणि बाजूने तूप सोडावे.

[/one_third]

[/row]