Mayonnaise Recipe: सँडविचपासून बर्गरपर्यंत सर्व गोष्टींमध्ये मेयोनीज वापरले जाते. लहान मुले मेयोनीजबरोबर अनेक पदार्थ आवडीने खातात. पण, बाजारात मिळणारे मेयोनीज आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. अशा परिस्थितीत तुम्ही ते घरी योग्य पद्धतीने तयार करू शकता. असे केल्याने, तुमची मुले निरोगी राहतीलच; पण तुम्हाला ते खरेदी करण्यासाठी वारंवार पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.

साहित्य:

  • एक कप क्रीम
  • १/४ कप तेल
  • २ चमचे व्हिनेगर
  • १/४ चमचा काळी मिरी
  • १/२ चमचा मोहरी पावडर
  • एक चमचा पिठीसाखर
  • मीठ चवीनुसार

घरी मेयोनीज बनवण्याची सोपी पद्धत

  • मेयोनीज बनविण्यासाठी सर्वप्रथम थंडगार क्रीम घ्या आणि मिक्सरच्या मदतीने ती ब्लेंड करा.
  • आता त्यात पिठीसाखर, तेल, मीठ, मोहरी पावडर घाला. त्यानंतर त्यात काळी मिरी घाला. सर्व साहित्य पुन्हा बारीक करा.
  • ते घट्ट झाल्यावर त्यात व्हिनेगर घाला आणि पुन्हा ब्लेंड करा.
  • आता ते हवाबंद डब्यात बंद करा आणि फ्रिजमध्ये ठेवा. तुम्ही ते सुमारे १५ दिवस साठवू शकता.