वांग्याचं ऑम्लेट! हे नाव ऐकूनच तुम्ही वाकड करु नका. अंड आणि ऑम्लेटच कॉम्बनेशन ऐकायला थोडं विचित्र वाटू शकते पण हा हेल्दी पदार्थ आहे. तसेच त्याच चव देखील चांगली आहे. नेहमी साध ऑम्लेट खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा हा पदार्थ खाऊन पाहा. तुम्हाला नक्की आवडेल. वांग्याचं ऑम्लेटची रेसिपी देखील सोपी आहे आणि झटपट तयार होते. तुमची मुलं वांग खात नसतील तर त्यांना वांग्याचं ऑम्लेट खायला देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी
वांग्याचं ऑम्लेट रेसिपी
साहित्य- वांगं, मशरूम, कोथिंबीर, कांदा, १ अंडे, चीझ (किसून), लाल तिखट, मीठ
हेही वाचा- साधं ऑम्लेट नेहमीच खाता, आता खाऊन पाहा स्पॅनिश ऑम्लेट! अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी
कृती – वांग्याच्या गोल चकत्या करून त्यांना तिखट मीठ लावून ठेवा. एका पातेल्यात अंडे, मशरूम, कोथिंबीर, चीझ, कांदा हे सर्व फेटून घ्या. एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून छोटे ऑम्लेट घाला. ते एका बाजूने शिजल्यावर त्यावर वांग्याचा एक काप ठेवून ते उलटा व खरपूस भाजा. या ऑम्लेटमध्ये इतर भाज्यादेखील घालू शकता.