प्रत्येक पदार्थ आपलं नशीब घेऊन जन्माला येत असतो. त्याची जडणघडण, त्याची करण्याची कृती वेगळी असली आणि प्रत्येकाचा परिणाम ठरलेला असला, तरी काही पदार्थांना हे नियम आणि शिस्त जरा जास्तच लावली जाते. विशेषतः ऋतूनुसार काही पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. टॉन्सिल्सचं आपरेशन झाल्यावर डॉक्टर आवर्जून आईस्क्रीम खायला लावतात (आणि आपल्याला ते जाम खाता येत नाही ना,) अगदी तसंच! त्या त्या पदार्थांमधल्या घटकांवर आणि त्यांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामावर तो पदार्थ कुठल्या ऋतूत, कुठल्या हवामानात आणि कुठल्या वेळी खायचा, हे ठरलेलं असतं. म्हणजे बहुधा असावं. काही वेळा ते आपल्या खिशावर होणाऱ्या परिणामावरही ठरतं म्हणा, पण तो मुद्दा इथे विचारात घ्यायला नको. सांगण्याचा मुद्दा काय, की शक्यतो हिवाळ्यात शरीरात उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांना आणि उन्हाळ्यात थंडावा आणणाऱ्या पदार्थांना जास्त पसंती दिली जाते. हल्ली कलिंगड वर्षभर खाल्लं जातं आणि मक्याची कणसंही कधीही मिळतात, ही गोष्ट वेगळी. आता डॉक्टरांचाच सल्ला घ्यायचा झाला, तर शक्यतो जिभेला जे चांगलं वाटतं, ते खाऊ नका, असं ते सांगतात. आपल्यासारखे खवय्ये पोटासाठी नाही, तर जिभेसाठी खात असतात, हे त्यांना कळत नसतं किंवा कळून वळत नसतं. तर ते असो. आपल्याला हवं ते हवं तेव्हा खावं आणि नंतर डॉक्टरांना सल्ला विचारावा, हे सगळ्यात बेस्ट. सध्या थंडीचा मोसम आहे. पण लोहा लोहे को काटता है, या नियमानुसार, आपण आज फालूद्याची रेसिपी बघूया. लिहून ठेवा, वाटलं तर उन्हाळा लागल्यावर करून बघा. काय हरकत आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा