नेहमी नेहमी डाळीचे आप्पे खाऊ कंटाळला आहात का? आज आम्ही तुम्हाला फ्लॉवरचे आप्पे कसे बनवायचे, हे सांगणार आहोत. सहसा आपण फ्लॉवरची भाजी करतो पण जर तुम्हाला फ्लॉवर आवडत असेल तर तुम्ही हा हटके प्रकार ट्राय करू शकता. फ्लॉवर आप्पे खायला जितके टेस्टी असतात तितकेच हेल्दी सुद्धा असतात. ब्रेकफास्टसाठी फ्लॉवर आप्पे चांगला पर्याय आहे. चला तर जाणून घेऊ या फ्लॉवरचे आप्पे कसे बनवायचे?
साहित्य :
- किसलेला फ्लॉवर
- रेडीमेड डोसा पावडर
- कापलेला कांदा
- हिरव्या मिरच्या
- लाल, पिवळी व हिरवी शिमला मिरची
- चिरलेली कोथिंबीर
- रिफाइंड ऑइल
- मीठ
कृती :
- सुरुवातीला रेडीमेड डोसा पावडरमध्ये थोडे पाणी घाला
- घट्ट घोळ बनवा.
- यामध्ये कापलेला बारीक कापलेले कांदा, हिरवी मिरची, लाल पिवळी शिमला मिरची, कोथिंबीर, आणि किसलेला फ्लॉवर टाका.
- त्यात थोडे मीठ टाका
- आप्पेच्या साच्यांना तेल लावा
- आणि त्यात थोडं थोडं मिश्रण ओता
- मिडियम आचेवर थोडे तेल घालून पलटून हे आप्पे भाजा
- दहा मिनिटांमध्ये फ्लॉवर आप्पे तयार होतील.