Video Shows How To Make Fruit Bhel : आपल्यापैकी अनेकांना प्रवासात भेळ खायला आवडत असेल. जुहू चौपाटीला गेल्यावर, संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर किंवा दुपारी भूक लागल्यावर सुद्धा आपण कुरमुरे, शेव, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, तिखट डाळ असे विविध पदार्थ एकत्र करून तयार केलेली भेळ नक्की खातो. यानेही तोंडाला एक वेगळीच चव येते आणि काही वेळासाठी पोट सुद्धा भरते. पण, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये चक्क फळांची पौष्टिक भेळ तयार करण्यात आली आहे.
पौष्टिक भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
- गाजर
- बिट
- काकडी
- सफरचंद
- डाळिंब
- संत्र (या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन दुसरे ॲड करायचे असेल तर करा).
- कांदा
- मिरची
- काळे मीठ
- चाट मसाला
- कोथिंबीर
- कुरमुरे
- मीठ
- लिंबू
- प्रोटीनसाठी मूग आणि चणे सुद्धा घाला.
व्हिडीओ नक्की बघा…
पौष्टिक भेळ बनवण्याची कृती
- एका बाउलमध्ये गाजर, बिट, काकडी, सफरचंद, डाळिंब, संत्र या फळांचे बारीक तुकडे घ्या.
- नंतर त्यात काळे मीठ, चाट मसाला, बारीक केलेला कांदा आणि मिरची, प्रोटीनसाठी मूग आणि चणे सुद्धा घाला.
- कोथिंबीर, मीठ, कुरमुरे घाला आणि वरून लिंबू पिळून घ्या.
- अशाप्रकारे तुमची पौष्टिक भेळ तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ @nehadeepakshah या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही पौष्टीक भेळ खाल्ल्याने तुम्हाला प्रोटीन तर मिळेलच आणि तुमचा चेहराही ग्लो करण्यास मदत करेल. तर आजच ही भेळ नक्की घरी बनवून बघा… त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. प्रत्येक जिल्ह्याची एक आगळी वेगळी ओळख आहे. त्यात भेळ हा सर्वांचा आवडता पदार्थ. महाराष्ट्राच्या वेगेवेगळ्या जिल्यात वेगवेगळ्या प्रकारची भेळ सुद्धा उपलब्ध असते. तर तुम्ही ही नवीन पद्धतीची भेळ सुद्धा बनवून बघा…