आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे व मुलांच्या परीक्षा संपून सुट्ट्या सुद्धा चालू झाल्या आहेत. मग रोज जेवण झाल्यावर थंड गार काही तरी पहिजे. आपण आइसक्रीम, फ्रूट सॅलड, निरनिराळे ड्रिंक्स बनवतो. आज आपण एक खूप छान डेझर्ट बनवणार आहोत.समरसाठी हे एक मस्त परफेक्ट पूडिंग आहे. फ्रुट कस्टर्ड पुडिंग हे अगदी अप्रतीम लागते. छोट्या पार्टीसाठी किंवा आपल्याला घरी झटपट करता येते. व बनवायला पण अगदी सोपे आहे. लहान मुलांना हे पुडिंग खूप आवडते. गरमीच्या दिवसात तर फारच छान लागते. चला तर पाहुयात हे फ्रुट कस्टर्ड पुडिंग कसे बनवतात.
फ्रुट कस्टर्ड साहित्य –
- १/२ लिटर दुध
- ३ टे स्पून कस्टर्ड पावडर
- १ टे स्पून साखर
- ३-४ थेंब व्हानीला इसेन्स
- सिझनल फ्रुट (द्राक्ष, संत्री, आंबा, केळे, चिकू, अंजीर, अननस)
फ्रुट कस्टर्ड कृती –
फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी सुरुवातीला कस्टर्ड शुगर बनवण्यासाठी १ कप दुधात कस्टर्ड पावडर, साखर मिक्स करून घ्या. बाकीचे दुध गरम करून कस्टर्ड पावडरचे दुध हळू-हळू मिक्स करा . मिश्रण घट्ट होई परंत मंद विस्तवावर हलवत रहा. घट्ट झाले की थंड करायला ठेवा. सर्व्ह करताना आपल्याला पाहिजे ती फळे सोलून तुकडे करून मिक्स करा. वरून स्ट्बेरी सॉसने सजवून मग थंड सर्व्ह करा.
हेही वाचा – चविष्ट, पौष्टिक मेथी मुठीया, गुजराती पद्धतीचे मेथीचे मुठीया एकदा नक्की ट्राय करा
उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खूश करा.