सध्या उन्हाळ्यात आईसस्क्रीम, कुल्फी खावीशी वाटते. अशात तुम्ही फ्रुटची कुल्फी घरच्या घरी बनवू शकता. ही कुल्फी घरी कशी बनवायची, हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घ्या रेसिपी…
साहित्य-
- दोन किवी
- २ पिच अथवा अननसचे काप
- एक कप स्ट्रॉबेरी अथवा कलिंगडाचे काप
- अर्धा कप संत्र्याचे तुकडे
- अर्धा कप काळी द्राक्षे
- २ कप सफरचंदाचा ज्यूस
- एक चमचा मध
कृती –
- सर्व फळे बारीक चिरून एकत्र करा.
- प्रत्येक मोल्डमध्ये ती दाबून भरा.
- सफरचंद ज्यूस आणि मध घालून मोल्डमध्ये वरील भाग थोडा कमी भरून तयार करा.
- रात्रभर हे पॉपसिकल्स फ्रिझरमध्ये सेट करण्यास ठेवा.
- खाण्यास देताना कोमट पाण्याखाली मोल्ड धरा आणि पॉपसिकल्सची मजा लुटा.
- हे रंगीबेरंगी फ्रुट पॉपसिकल्स खेळून आल्यावर मुलांना देऊ शकता
- अथवा रात्री स्वीट डिश म्हणूनही याचा आस्वाद घेऊ शकता.