घाटी मसाला चटणी ही सांगली, कराड, सातारा, कोल्हापूर या भागात विशेष करून स्वयंपाकात वापरतात. ही मसाला चटणी करणे मोठे कष्टदायक काम आहे.पण घरी बनवलेली चव काही न्यारीच असते. मग त्यात आपण एक शाॅर्टकट वापरू शकतो. अगदी मिरच्या आणणे, वाळविणे, कुटणे व मिरची पूड करणे,व नंतर पुढे मसाला करणे .या महाकष्टमय कामापेक्षा मिरचीपूड तयार आणावी व बाकी सर्व गरम मसाले,ओला मसाला घरी आणून मग चटणी करावी. लवकर होते.शहरी भागात रहात असू तर मिरच्या आणणे व वाळवणे जिकीरीचे होते.हा मसाला नुसता ही खायला भाकरी,चपाती सोबत सर्वाना आवडतोच ! चला तर मग हा झटपट मसाला कसा करायचा पाहू

१ किलो घाटी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Unauthorized parking lots, dhabas, Dronagiri,
उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे
  • संकेश्वरी मिरची – १/४ किलो
  • लवंगी मिरची – १००ग्राम
  • सुखे खोबरे – १ वाटी
  • धने – २००ग्राम
  • सफेद तीळ – १००ग्राम
  • कांदे – २ मोठे
  • बडीशेप – २ टी स्पून
  • मसाला वेलची – ८ नग
  • लाल फुल – १
  • चक्री फुल – २ नग
  • हिरवी वेलची – ८ नग
  • जायफळ – अर्ध नग
  • काली मिरी – १५ ग्राम
  • मेथी – १० ग्राम
  • खसखस – २० ग्राम
  • तिरफळ – ८ नग
  • दालचिनी – १० ग्राम
  • लवंग – १० ग्राम
  • शाही जिरे – १० ग्राम
  • तेजपत्ता – ८ पाने
  • जिरे – १० ग्राम
  • दगडी फुल – १० ग्राम
  • लसूण – ३ मोठे कांदे
  • अद्रक – ५० ग्राम
  • कोथिंबीर – ५० ग्राम

घाटी मसाला बनवण्याची योग्य पद्धत –

  • कांद्याचे पातळ तुकडे करून तेलात सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा, त्यांना थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • जड-तळाच्या पॅनमध्ये, किसलेले खोबरे गडद तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या आणि बाजूला ठेवा.
  • त्याच पॅनमध्ये, लाल मिरच्या (दोन्ही प्रकारच्या) कुरकुरीत आणि गडद तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.
  • तसेच महाराष्ट्रीयन गरम मसाला मिश्रण हलका तपकिरी होईपर्यंत तळा, ही प्रक्रिया मध्यम आचेवर करा.
  • आता वर दिलेल्या साहित्यातील प्रत्येक पदार्थ वेगवेगळं तळा, कारण तरच ते नीट भाजलं जाईल.
  • जर तुम्ही हळदीऐवजी जायफळ पावडर आणि हळद पावडर वापरत असाल तर ते हलके गरम करा.
  • सर्व मसाले थंड झाल्यावर प्रथम भाजलेला गरम मसाला बारीक करून घ्या आणि त्यात लाल मिरची पावडर घालून बारीक करा.

हेही वाचा >> घरीच बनवा अस्सल चवीचा “मालवणी मसाला”; १ किलोच्या प्रमाणात…जाणून घ्या सोपी मराठी पद्धत

  • आता त्यात भाजलेले कोरडे खोबरे, लसूण आणि तळलेले कांदे घालून बारीक वाटून घ्या.
  • तयार मसाला स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवा.नुसता सुध्दा तेल घालून भाकरीसोबत खायला छान लागतो.भाजी-आमटीची चव तर अप्रतीम लागते.तुम्हीही नक्की करून बघा !