Guava Chutney Recipe: हिरवेगार पेरू बाजारात पाहायला मिळतात. तिखट मीठ लावून पेरु खायची मजाच काही वेगळी. रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये तुम्ही पेरुचा वापर करू शकता. चपातीबरोबर किंवा वरणभाताबरोबर खाण्यासाठी पेरूची चटणी हा उत्तम बेत तयार होतो. पेरूची चटणी बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. पेरूमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज यांसारखी खनिजे पेरूमध्ये आढळतात. पेरूमध्ये कॅरोटीनोइड्स आणि पॉलीफेनॉल आढळतात जे त्यांना वृद्धत्वविरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्मांसह केस आणि त्वचा सुधारण्यास मदत करतात. चला तर पाहुयात पेरुची मसालेदार आंबट गोड चटणी कशी करायची
पेरूची चटणी बनवण्याचे साहित्य
- पेरू – १-२ (बिया काढून टाकाव्यात)
- कोथिंबीर पाने – ५० ग्रॅम
- हिरवी मिरची – २-३
- आले – १ तुकडा
- लिंबाचा रस – १ टीस्पून
- जिरे पावडर – अर्धा टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- काळे मीठ – चवीनुसार
पेरू चटणी रेसिपी
- हलके पिकलेले पेरू घ्या. ते कापून सर्व बिया काढून टाका.
- कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले पाण्याने चांगले धुवून घ्या. हिरवी मिरची आणि आले कापून घ्या.
- आता पेरू, कोथिंबीर, हिरवी मिरची मिक्सरमध्ये टाका. हे तीन पदार्थ एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- आता त्यात जिरेपूड, आले, मीठ, काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला.
- पुन्हा बारीक करून त्याची पेस्ट बनवा.
- तुम्हाला जितकी चटणी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही घटकांचे प्रमाण घेऊ शकता.
हेही वाचा >> Shev Bhaji Recipe : १० मिनिटांत बनवा झणझणीत ढाबा स्टाईल ‘शेवभाजी’, नोट करा सोपी रेसिपी
- आंबट गोड आणि मसालेदार पेरू चटणी तयार आहे. भात, डाळ, रोटी आणि भाजी, चपाती इत्यादी सोबत खाण्याचा आनंद घ्या.