[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला हळवा कोपरा असतो. आजी म्हणजे मायेची सय. आजी म्हणजे दुधावरची साय. आजी म्हणजे प्रेमाची भाकर. आजी म्हणजे दुधात साखर. सुरकुतलेल्या हातांनी, आपुलकीच्या स्पर्शानं ती जेव्हा आपल्याला कुरवाळते, तेव्हा सगळी दुःखं, सगळे त्रास पळून जातात. `कसा आहेस बाळा,` असं विचारते, तेव्हा शरीरातला थकवा कुठच्या कुठे नाहीसा होतो आणि मन पिसासारखं हलकं होतं. अख्ख्या जगाबद्दलचा आपल्या मनातला भयंकर रागही आपण विसरून जातो. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शत्रूलाही आपण अशा अवस्थेत माफ करू शकतो. मी मायेनं केसांवरून हात फिरवते, तेव्हा आपला भांग विस्कटला, हेअरस्टाईल बिघडली, म्हणून आपण कटकट करत नाही. तिनं भल्या पहाटे उठून केलेले लाडू, चिवडा, लोणची, अशा पदार्थांची शिदोरी आपल्या सामानात जड होत नाही किंवा आपलं डाएटही बिघडवत नाही. `सावकाश जा रे बाबा`, हा तिचा सल्ला मुख्य रस्त्याला लागल्या-लागल्या आपण धुडकावून लावणार आहोत, हे माहीत असतानाही आपण अगदी आज्ञाधारकपणे ऐकून घेतो. सगळ्यांनी कायम एकत्र राहावं, दगदग करू नये, तब्येतीची काळजी घ्यावी, आठवड्यातून दोनदा तरी फोन करावा, एखादवेळी सविस्तर पत्र लिहावं, या आपल्या अपेक्षांपैकी कुठलीच अपेक्षा सर्वार्थानं पूर्ण होण्याची शक्यता नाही, याची तिलाही कल्पना असते, पण दरवेळी गावाहून निघताना ती यापैकी एकही निरोप द्यायचं विसरत नाही. आपण मात्र आपल्या घरी आल्यानंतर तिला विसरतो. वर्ष-दोन वर्षांनंतर तिला भेटायला जातो, तेव्हा ती जरा आणखी थकलेली असते. लहानपणी सगळ्या संदर्भांसह, रंगवून सांगितलेल्या राजाराणी, राक्षसाच्या गोष्टी सोडा, रोजच्या व्यवहारातल्या गोष्टीही ती विसरायला लागलेली असते. आता तिला जास्त जपायची वेळ आलेली असते. तरीही निघताना तीच हातावर गूळ-पापडीची वडी ठेवून म्हणते, `जपून जा रे बाबा!`

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य

  • दोन वाट्या गव्हाचे पीठ
  • एक वाटी जाड पोहे
  • एक वाटी साजूक तूप
  • एक वाटी गूळ (किसलेला)
  • वेलदोडे आणि जायफळ यांची पूड प्रत्येकी १ चमचा
  • काजू व बदाम यांचे काप

[/two_thirds]

[one_third]

पाककृती

  • गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून त्या गरम तुपात जाडे पोहे तळून घ्यावेत.
  • गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून पूड करून घ्यावी.
  • त्याच कढईत थोडेसे साजूक तूप गरम करावे.
  • गरम झाल्यावर त्यात कणिक घालावी.
  • कणकेचा रंग तांबूस होईपर्यंत खमंग भाजून घ्यावी. खमंग वास सुटला पाहिजे.
  • त्याच्यात जाड पोह्यांची पूड घालून चांगले मिक्स करावे.
  • या मिश्रणात किसलेला गूळ घालून तो पातळ होईपर्यंत हलवत राहावे.
  • मग त्यात वेलदोडे आणि जायफळ यांची पूड टाकूनचांगले हलवून मिक्स करावे.
  • एका पसरट ताटाला तूप लावावे आणि त्यात हे मिश्रण ओतावे.
  • वाटीच्या बूडाला तूप लावून ते मिश्रण वाटीच्या साह्याने ताटभर पसरावे.
  • गरम असतानाच वड्या पाडाव्यात.
  • काजू बदामाचे काप पसरून सजवावे.
  • थंड झाल्यावर वड्या काढाव्यात.

[/one_third]

[/row]