How to make hariyali puri recipe: सण उत्सव म्हटले की पुरी, श्रीखंड, पुरणपोळी असे पदार्थ घराघरात बनवले जातात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पंच पक्वान्नांचा स्वयंपाक करून सण साजरा केला जातो. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पुऱ्या खाल्ल्या असतील. पण आज आपण हरियाली पुरीची रेसिपी पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरियाली पुरी बनवण्यासाठी साहित्य

२ कप गव्हाचे पीठ

२ चमचे रवा

२ चमचे बेसन

१ कप हिरवे वाटाणे

१ कप कोथिंबीर बारीक चिरलेले

चवीनुसार मीठ

हिरवी मिरची बारीक चिरलेली

लसूण-आले पेस्ट

हळद

जिरे पूड

काळी मिरी पावडर

गरम मसाला

आवश्यकतेनुसार तेल

हरियाली पुरी बनवण्याची पद्धत

ही पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम फ्रोजन वाटाणे पाण्यात हलके उकळून घ्या. जेणेकरून ते शिजेल. नंतर त्याचे पाणी गाळून घ्या आणि वाटाणे बारीक करून घ्यावे.

आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात रवा आणि बेसन मिक्स करा. त्यात हिरव्या वाटाण्याची पेस्ट घाला. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट घालून चांगले मिक्स करावे.

तसेच मीठ, हळद, गरम मसाला, काळी मिरी पावडर घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. आता हे पीठ अर्धा तास सेट होण्यासाठी बाजूला ठेवा.

हेही वाचा >> संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हेल्दी सोया मोमोज; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

आता या पीठाच्या पुऱ्या लाटून घ्या. तेल गरम करून यात पुऱ्या नीट तळून घ्या. तुमची हरियाली पुरी तयार आहे. गरम गरम पुरी भाजीसोबत सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make hariyali puri recipe hariyali puri recipe in marathi srk