Cookies Recipe : अनेक लोकांना कुकीज खायला खूप आवडते पण मार्केटमधून विकत आणलेल्या कुकीजमध्ये मैदाचा वापर केला जातो. मैदाचे सेवन हे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. जर तुम्हाला कुकीज आवडत असेल तर ओट्स आणि हनी पासून बनविलेले हेल्दी कुकीज हे बेस्ट ऑप्शन आहे. आज आपण हे कुकीज कसे बनवायचे, याविषयी जाणून घेऊ या.
साहित्य-
- ३ मोठे चमचे बटर
- अर्धा कप ब्राऊन शुगर
- पाव कप मध
- एक अंड
- एक मोठा चमचा पाणी
- अर्धा कप गव्हाचे पीठ
- अर्धा चमचा मीठ
- पाव चमचा बेकिंग सोडा
- दीड कप ओटस
- हवे असल्यास खजूर
- काजू अथवा काळ्या मनुकांचे काप
हेही वाचा : खवय्यांनो, ओट्स-मूगडाळपासून बनलेला हेल्दी दहीवडा खाल्ला का? ही सोपी रेसिपी नोट करा
कृती-
- ओव्हन ३५० डि.फॅ. वर तापवा.
- कुकीशिटला ब्रशने तेल लावा.
- बटर, ब्राऊन शुगर अंड आणि पाणी एकत्र करून चांगले फेटा
- कोरडे पदार्थ एकत्र करून ते ओटस्मध्ये घाला.
- कोरडे आणि ओलसर सर्व पदार्थ एकत्र करून मिश्रण तयार करा. कुकीज शीट वर मिश्रणाचे गोळे घालून १२ ते १५ मिनिटे मिश्रण बेक करा.
- त्यानंतर कुकीज थंड करून त्यांचा आस्वाद घ्या.