Fish Curry Recipe : फिश करी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. फिश करी जितकी टेस्टी असते तितकीच हेल्दी असते. फिश करीमध्ये अनेक पौष्टीक घटक असतात.
आज आपण फिश करी करण्याची एक हटके पद्धत जाणून घेणार आहोत. आजच्या खास फिश करीमधून तुम्हाला १०० किलो कॅलरीज, ९.५ ग्रॅम प्रोटिन्स, १.२ ग्रॅम फायबर, ४९० मि. ग्रॅम फोलेट आणि ०.८ मि.ग्रॅ. आयर्न असे पौष्टीक घटक मिळतील. चला तर जाणून घेऊया ही फिश करी कशी बनवायची?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य –

  • पापलेट २ तुकडे
  • आलं-लसूण पेस्ट १ चमचा
  • हळद अर्धा चमचा
  • लाल तिखट पाऊण चमचा
  • मीठ चवीनुसार
  • लिंबू रस १ मोठा चमचा
  • करी बनवण्यासाठी टोमॅटो १
  • कांदा अर्धा
  • सुकं खोबरं दोन चमचे (१० ग्रॅम)
  • लाल तिखट
  • कडीपत्ता
  • जिरे
  • हिरवी मिरची
  • गरम मसाला अर्धा चमचा
  • तेल २ चमचे

हेही वाचा : Vegan Red Lentil Soup : जितके टेस्टी तितकेच हेल्दी! आता घरीच बनवा Vegan लाल मसूरचे सूप, रेसिपी करा सेव्ह

कृती –

  • पापलेटच्या तुकड्यांना आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, लिंबू रस हे १५ मिनिटांकरिता लावून ठेवावे.
  • कढईमध्ये तेल गरम करावे.
  • त्यात कांदा रंग बदलेपर्यंत परतवा.
  • त्यात टोमॅटो बारीक चिरून घाला.
  • १० मिनिटे शिजवा.
  • सुकं खोबरं, मसाल्याचे पदार्थ घातल्यानंतर पापलेटचे तुकडे घाला.
  • एक कप पाणी घालून १० मिनिटे मंद आचेवर शिजवा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make healthy and tasty fish curry recipe healthy food for healthy lifestyle ndj