थंडीच्या वातावरणात शरीराला गरम ठेवण्यासाठी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो जे गरम असतात. पटकन बनून तयार होतील आणि खायला चवदार लागतील असे पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. ज्वारीची भाकरी, बाजरीची खिचडी असे पदार्थ हिवाळ्यात अनेक घरांमध्ये खाल्ले जातात कारण यातून शरीराला पुरेपूर पोषण मिळते आणि शरीरालात उष्णता मेंटेन राहते. बाजरीची खिचडी करण्याची सोपी रेसपी पाहूया.
बाजरीची खिचडी करण्याचे साहित्य
१. बाजरी- २ कप
२. शेंगदाणे- १ कप
३. तूप- २ टेबलस्पून
४. हिंग- १ टिस्पून
५. जीरं- १ छोटा चमचा
६. धणे पावडर- १ टिस्पून
७. गरम मसाला- टिस्पून
८. लाल मिरची पावडर- २ टिस्पून
९. मीठ- चवीनुसार
बाजरीची खिचडी करण्याचे कृती
सगळ्यात आधी बाजरी १० मिनिटांसाठी भिजवून घ्या नंतर बाजरी पाण्यात भिजवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून बाजरी वेगळी ठेवा. नंतर बाजरी कुटून बारीक करून घ्या. त्यातून निघणारा भूसा वेगळा करा.
प्रेशर कुकरमध्ये बाजरीसह शेंगदाणे घालून ४ ते ५ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या. नंतर बाजरी मऊ झाल्यानंतर समजून जा की बाजरी व्यवस्थित शिजली आहे.
आता एका कढईमध्ये तूप घाला आणि त्यात हिंग, जीरं असे फोडणीचे इतर साहित्य घाला. नंतर त्यात धणे पावडर, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घाला.
हेही वाचा >> घरी बनवा हॉटेल स्टाइल ड्रॅगन चिकन; ताट पुसून खाल अशी कधीच न खाल्लेली चिकन रेसिपी
त्यानंतर शिजवलेली बाजरी त्यात घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून १० ते १५ मिनिटं शिजवून घ्या. तयार आहे मऊ-गरमागरम बाजरीची खिचडी. ही खिचडी तुम्ही लोणचं, पापडाबरोबर सर्व्ह करू शकता.