नाश्त्यात दररोज काय नवीन बनवावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तुम्हालाही दररोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही लापशी नाश्त्यामध्ये ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवायला देखील सोपी आणि हेल्दी देखील आहे. आज आपण बाजरीची लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत. बाजरी खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत. बाजरीपासून बनवण्यात आलेली लापशी पौष्टिक असते. ही लहान बाळांसाठी देखील पोषक आहे. चला तर मग जाणून घेऊया याची रेसिपी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • बाजरीची भरड २ कप
  • चिरलेला कांदा अर्धा कप
  • चिरलेला बटाटा अर्धी वाटी
  • चिरलेला टोमॅटो अर्धा कप
  • तूप दोन चमचे
  • जिरे एक चमचा
  • लवंग ३-४
  • हिंग अर्धा चमचा
  • लाल तिखट अर्धा चमचा
  • हिरव्या मिरच्या २
  • तमालपत्र १
  • कढीपत्ता ६-७

( हे ही वाचा: उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी घरच्याघरी बनवा ‘आंबा सरबत’, जाणून घ्या सोपी रेसिपी)

कृती

बाजरीची लापशी पाण्यात उकळून बाजूला ठेवावी. एका खोलगट भांड्यात तूप गरम करून त्यात हिंग तमालपत्र जिरे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालावा त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. कांदा हलका गुलाबी झाला की त्यात लाल तिखट हळद आणि मीठ घालावं. त्यात बटाट्याचे तुकडे घालून शिजवावेत. बटाटे शिजत आल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो आणि बाजरीची भरड घालावी. छान जाड होत आल्यावर गॅस बंद करावा. ही लापशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवावी..

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make healthy bajari lapashi at home know easy recipe gps