बाहेर मिळणाऱ्या सॅन्डविच, पिझ्झा, पास्ता यांसारख्या पदार्थांवर, अगदी भरभरून चीज घालून दिले जाते. अनेक चीज प्रेमींना पदार्थांवर किसून घातलेल्या चीजकहा डोंगर खाण्यासाठी प्रचंड आवडते. मात्र बाहेर मिळणाऱ्या चिजी पदार्थांचा आपल्या आरोग्यावर फारसा चांगला परिणाम होत नाही. अशात तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल किंवा बाहेरचे पदार्थ खाणे टाळण्याचा विचार करत असाल; पण तुम्हाला चीज खाणे सोडायचे नसल्यास, तुमच्यासाठी एक अत्यंत सोपी अशी चीज स्प्रेडची रेसिपी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बनवायला सोपी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील @nehadeepakshah नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे. आपल्या घरात हमखास उपलब्ध असणाऱ्या, दूध आणि दह्याचा वापर करून नेहाने हे घरगुती चीज स्प्रेड बनवले आहे. त्याची नेमकी रेसिपी काय आहे ते पहा

हेही वाचा : ‘हा’ पदार्थ वापरून बनवा ‘कोकणी व्हेज फिश करी’! काय आहे याची भन्नाट अशी रेसिपी अन् प्रमाण पाहा…

साहित्य

१ लिटर दूध
२ ते ३ चमचे लिंबाचा रस/व्हिनेगर
२ लहान चमचे मीठ
दह्याचा चक्का [हंग कर्ड]
१ चीज क्यूब

कृती

सर्वप्रथम, गॅसवर एक पातेलं ठेऊन त्यामध्ये दूध तापवण्यासाठी ठेवावे. दूध उकळ्यानंतर थोडे मीठ आणि लिंबाचा रस किंवा व्हीनेगर घालून घेऊन दूध फाडून घ्यावे.
आता नासवले दूध गाळून, सूती कापडामध्ये घालून घेऊन त्यातील सर्व पाणी काढून घ्यावे.
मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी काढून घेतलेल्या दुधाचा चक्का आणि दही घालून घ्या. त्यामध्ये एक चूज क्यूब आणि थोडे मीठ घालून सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्या.
हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये तयार चीज स्प्रेड घालून फ्रिजमध्ये साठवून ठेवावे.
घरी बनवलेले हे चीज स्प्रेड साधारण आठवडाभर टिकून रहाते.

@nehadeepakshah या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओला आजपर्यंत ३.३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make healthy cheese spread at home recipe note down this amazing and super easy recipe dha
Show comments