Makhana raita recipe : जेवणाबरोबर अनेकांना सॅलड, रायते किंवा कोशिंबीर खाण्याची सवय असते. अशात आपण नेहमी काकडी, गाजर किंवा बीटाची कोशिंबीर किंवा रायते बनवतो. मात्र सध्या सर्वांना आवडणारे ‘माखणे’ वापरूनदेखील आपण पौष्टिक आणि झटपट तयार होणारे रायते कसे बनवायचे ते पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वजन कमी करायचे असल्यास किंवा अरबटचरबट पदार्थ खाणे टाळायचे असल्यास सध्या अनेकजण ‘मखाणे’ खाणे पसंत करत आहेत. अर्थात मखाणे तेवढे पौष्टिकदेखील आहेत. कारण – या पदार्थामध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विविध जीवनसत्त्वे वगैरे पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे मखाणे खाल्याने आपली तात्पुरती भूक भागते आणि आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकदेखील यामधून मिळत असतात. तर, आज या पौष्टिक मखाण्यापासून चटपटी आणि कुरकुरीत रायते कसे बनवायचे ते पाहू. काय आहे त्याची रेसिपी एकदा नीट पाहा आणि झटपट बनवून बघा.

हेही वाचा : स्पेशल कोकणी रेसिपी : कैरी घालून ‘वाटपाची डाळ’ कशी बनवावी? काय आहे साहित्य, Recipe पाहा…

मखाण्याचे रायते :

साहित्य

एक कप मखाणा
दोन कप दही
हिंग
चाट मसाला
मिरपूड
हिरव्या मिरच्या
जिरे पूड
गूळ
काळे मीठ
मीठ
डाळींब दाणे
कोथिंबीर

हेही वाचा : Recipe : अशा पद्धतीने कारल्याच्या काचऱ्या बनवाल तर, कडवटपणा झटक्यात विसरून जाल! ही रेसिपी पाहा…

कृती

सर्वप्रथम गॅसवर एक पॅन ठेवा.
मध्यम किंवा मंद आचेवर एक कप साधारण ६ ते ७ मिनिटे मखाणे भाजून घ्या.
मखाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे.
आता एका बाऊलमध्ये दोन कप दही घ्या.
दह्यामध्ये भाजलेले कुरकुरीत मखाणे घालून घ्या.
आता यात हिंग, चाट मसाला, मिरपूड, घालून घ्या.
त्याबरोबरच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे भाजून तयार केलेली जिरे पूड, २ चमचे गूळ घालून एकदा सर्व मिश्रण ढवळून घ्या.
सगळ्यात शेवटी या रायत्यामध्ये डाळिंब दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे काळे मीठ आणि साधे मीठ घालून सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
तयार आहे आपले थोडे चटपटीत, गोड आणि कुरकुरीत असे मखाण्याचे रायते.

ही अतिशय सोपी आणि पौष्टिक रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @sagarskitchenofficial नावाच्या अकाउंटने शेअर केली केली आहे. या रेसिपी व्हिडीओला आत्तापर्यंत १३.३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make healthy makhana raita try this amazing and simple crunchy salad recipe in marathi dha
Show comments