तुम्हाला मशरूम खायला आवडतात का? मग आमच्याकडे तुमच्यासाठी एक हटके रेसिपी आहे. आम्ही तुम्हाला टेस्टी आणि हेल्दी मशरूम लॉलीपॉप्स कसे तयार करायचे हे सांगणार आहोत. ही रेसिपी घरच्या घरी तयार करता येईल इतकी सोपी आहे. तुम्हाला मुलांसाठी काहीतरी हेल्दी आणि हटके पर्याय हवा असेल तर हे मशरूम लॉलीपॉप्स उत्तम पर्याय आहे. तुमच्या घरी कोणी पाहूणे येणार असतील किंवा काही खास बेत असेल तेव्हा देखील बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडेल.
हेल्दी आणि टेस्टी मशरूम लॉलिपॉप्स रेसिपी
साहित्य- १ पॅकेट बटण मशरूम, सारणासाठी – सगळं बारीक चिरून -कांदा, गाजर, सिमला मिरची, पनीर, चीझ, हिरवे मूग (भिजवलेले), हर्बज्, सेंधव, मिरपूड चवीनुसार मॅरिनेशनसाठी – चक्का, मीठ, चाट मसाला
हेही वाचा –गरमा गरम ब्रोकोली सूप प्या आणि हेल्दी रहा, ‘ही’ घ्या सोपी रेसिपी
कृती – मशरूमचा दांड्याचा भाग काढून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, गाजर, पनीर, सिमला मिरची, मूग, चीझ, हर्बज् यांचे सारण भरा. दोन मशरूम एकमेकांवर ठेवून ते टूथपिकने बंद करा. हा लॉलीपॉप चक्क्याच्या मिश्रणात बुडवून तव्यावर किंवा तंदूरमध्ये खमंग भाजा
टीप – हे लॉलिपॉप्स प्रथिने, बी कॉम्प्लेक्स, अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिजांनी परिपूर्ण आहे.