Green Moong : अंकुरित मूगामध्ये कॅलरीज कमी व पोषक जास्त प्रमाणात असतात. अंकुरलेले कडधान्य फायबर, प्रथिने युक्त तसंच कमी चरबीयुक्त, कोलेस्टेरॉल मुक्त असते. प्रति १०० ग्रॅम मूगामध्ये फक्त ३० कॅलरीज आढळून येतात. मूगामध्ये असलेले फायबर अन्न पचनास मदत करते. म्हणून अनेक गृहिणी याचे वेगवेगळे पदार्थ बनवून पाहतात. तुम्ही आतापर्यंत मुगाची भाजी, मुगाची भजी, मुगाची उसळ, मूग सॅलड, मूग चिला आदी विविध पदार्थ बनवले असतील. पण, आज आपण मुगाचे बिरडे कसे बनवायचं हे पाहणार आहोत.

साहित्य :

१. एक वाटी हिरवे मूग (Green Moong)

tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती

२. एक वाटी चिरलेला कांदा

३. राई, जिरे, कडीपत्ता

४. खोबरं (ओलं किंवा सुखं)

५. हिंग, तेल, कोथिंबीर

  • कृतीकडे वळण्यापूर्वी सकाळी मूग (दहा तास) भिजवत ठेवा.
  • भिजवून झाल्यानंतर ते सुती कपड्यात बांधून ठेवणे.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी मोड आलेल्या मूगाचे साल काढून घेणे.

हेही वाचा…Masala Kaju: सतत भूक लागते? चिप्स खाण्याऐवजी घरीच करा ‘हा’ चटकदार पदार्थ; रेसिपी लिहून घ्या

कृती :

१. गॅसवर कढई ठेवा. तेल घ्या त्यात राई, जिरे, हिंग, कडीपत्ता, कांदा, तिखट, हळद, मीठ, मसाला घाला.

२. नंतर त्यात मूग घाला आणि परतवून घ्या. जेवढा तुम्हाला सार बनवून घ्यायचा आहे तेवढं त्यात पाणी घाला.

३. मूग शिजल्यानंतर त्यातले थोडे मूग, खोबरं, कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या.

४. बारीक केलेलं मिश्रण, बिरड्यामध्ये घालणे,

५. नंतर त्यात चवीपुरता गूळ घाला आणि व्यवस्थित शिजवून घ्या.

६. गॅस बंद करा. अशाप्रकारे तुमचे मूगाचे बिरडे तयार.

७. तुम्ही मूगाचे बिरडे तांदळाची भाकरी, पोळी, भाताबरोबरही खाऊ शकता.

आपण दररोज वरण-भात, पोळी-भाजी खातो. पण, कधी तरी आपल्याला पौष्टीक व रस्सेदार खावंसं नक्कीच वाटतं. तर अशावेळी तुम्ही ही रस्सेदार आणि चविष्ट भाजी नक्की बनवून पाहा. कारण हिरवे मूग ग्लूटेन-मुक्त असल्यामुळे सीलिएक रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हा आहाराचा एक चांगला स्रोत आहे. हिरव्या मूगात (Green Moong) मोठ्या प्रमाणात बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात.