दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भाजी काय करायची हा प्रश्न अनेकदा पडतो. तेव्हा आई झटपट अंड्याची पोळी किंवा भुर्जी बनवते. पण सतत अंड्याची पोळी, अंड्याची भुर्जी खाऊन कंटाळा येतो. तर आज आपण एक खास पदार्थ पाहणार आहोत. ज्याचे नाव आहे ‘अंड्याचे कटलेट’ . तर अंड्याचे कटलेट कसे बनवायचे याची सोपी रेसिपी एका इन्स्टाग्राम युजरने शेअर केली आहे. चला तर पाहू सोपी रेसिपी.
कृती –
- अंडी – ४
- धणे पावडर
- कांदा – १
- लसूण – चार पाकळ्या
- हिरवी मिरची – २
- तांदळाचे पीठ
- मीठ
- गरम मसाला, हळद
- कोथिंबीर
- बेसन
हेही वाचा…सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा झटपट अन् कुरकुरीत ‘पोळीचा चिवडा’ ; नोट करा सोपी रेसिपी
साहित्य –
- सुरवातीला भांड्यात पाणी घाला आणि अंडी उकडवून घ्या व त्यात थोडं मीठ घाला.
- त्यानंतर अंडी सोलून घ्या आणि किसणीवरून किसून घ्या.
- त्यात हळद, मसाला, धणे पावडर , गरम मसाला, ठेचलेली लसूण, हिरवी मिरची, कांदा, तांदळाचे पीठ, बेसन, मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
- त्यानंतर या मिश्रणाचे लहान-लहान कटलेट बनवून घ्या.
- त्यानंतर पॅनवर तेल घाला आणि कटलेट खरपूस भाजून घ्या.
- अशाप्रकारे तुमचे ‘अंडयांचे कटलेट’ तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @devakkaljilifeinkonkan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.