बऱ्याचदा कोशिंबीर बनवताना त्यात काकडी, गाजर बरोबर बीट सुद्धा आवर्जून घातले जाते. बीट हे पौष्टिक असून याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पण, बीट खाण्याचा अनेक जण कंटाळा करतात. म्हणून बीटापासून अनेक गृहिणी विविध पदार्थ देखील बनवतात. जर तुमच्याही घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बीट खाण्याचा कंटाळा करत असतील. तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तर आज आपण ‘बीट पराठा’ कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य :
- पाव किलो बीट
- हळद
- मीठ
- मसाला
- गरम मसाला
- धने-जिरे पावडर
- तेल (तूप किंवा बटर आवडीनुसार)
- मीठ
- गव्हाचे पीठ
हेही वाचा…अचूक प्रमाण अन् टिप्ससह बनवा स्वादिष्ट, गुलाबी खरवस ; पाहा रेसिपीचा सोपा VIDEO
कृती :
- पाव किलो बीट धुवून घ्यायचे.
- बीटाची साल काढून त्याला कुकरमध्ये उकडवून घ्या.
- मिक्सरच्या भांड्यात हे उकडलेलं बीट घाला आणि त्यात हळद, मीठ, मसाला आणि गरम मसाला, धने-जिरे पावडर घाला.
- हे सर्व मिस्करमध्ये बारीक करून घ्या आणि पाणी अजिबात घालू नका.
- त्यानंतर सर्वप्रथम परातमध्ये गव्हाचे पीठ घ्या त्यात तेल घाला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण पिठात एकजीव करून घ्या.
- पाच मिनिटे असंच ठेवा व नंतर या पिठाचे गोळे करून घ्या.
- त्यानंतर पोळी लाटतात त्याप्रमाणे लाटून घ्या आणि तव्यावर तूप, बटर किंवा तेल या पैकी कोणताही एक पदार्थ वापरून पराठे शेकून घ्या.
- तुम्ही बीट पराठा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता.
- तर अशाप्रकारे ‘बीट पराठा’ तयार.