दिवसभर काम करून, थकून घरी आलं की, काही तरी आगळंवेगळं खाण्याची खूप इच्छा होते. कधी चटपटीत, तर कधी गोड खाण्याची सुद्धा इच्छा होते. पण, अशावेळी घरात काही उपलब्ध असेलचं असं नाही. त्यामुळे कधी तरी मॅगी, पास्ता, सूप बनवून आपण भूक भागवून घेतो. पण, हे सगळे पदार्थ तर आपण नेहमीच खातो. जर घरात ब्रेड आणि दोन कप दूध असेल तर तुम्ही एक गोड पदार्थ अवघ्या पंधरा मिनिटांत बनवू शकता. सोशल मीडियावर एका युजरने ब्रेडपासून बनणाऱ्या एका खास पदार्थाची रेसिपी दाखवली आहे ; याचे नाव आहे ‘ब्रेड कस्टर्ड’ . चला तर पाहुयात अवघ्या १५ मिनिटांत बनणाऱ्या या पदार्थाची सोपी रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृती –

चार ब्रेड
१/२ कप तेल
१ चमचा तूप
दोन कप दूध
पाच चमचे साखर
१/४ चमचे केसर
२ चमचे कस्टर्ड पावडर
मीठ

हेही वाचा…१ वाटी मूग वापरून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट, आरोग्यदायी भेळ; VIDEO पाहा अन् रेसिपी लिहून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

साहित्य –

चार ब्रेडचे तुकडे घ्या व त्यांच्या कडा काढून घ्या.
ब्रेडच्या कडा काढून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या.
एका पॅनमध्ये तेल घाला किंवा तूप घाला.
ब्रेडचे तुकडे थोडे ब्राउन होईपर्यंत तळून घ्या व एका बाउलमध्ये काढून घ्या.
नंतर दुसऱ्या पॅनमध्ये थोडं दूध, पाच चमचे साखर आणि केसर घाला.
दूध थोडा वेळ उकळू द्या.
एक भांड्यात १/२ कप दुध त्यात दोन चमचे कस्टर्ड पावडर मिसळा व नंतर उकळून घेतलेल्या दुधात घाला.
दुधात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. नंतर त्यात किंचित मीठ घाला.
नंतर ब्रेडच्या तुकड्यांमध्ये हे तयार मिश्रण घाला.
अशाप्रकारे तुमचे ‘ब्रेड कस्टर्ड’ तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @banglarrannaghor या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. रात्री जेवणानंतर अनेकांना गोड खाण्याची खूप इच्छा होते. तर ऑफिसमधून आल्यावर काही तरी पोटभर खावसं वाटते. तर छोटी भूक भागवण्यासाठी ब्रेड हा पदार्थ बेस्ट आहे. सकाळी नाश्त्यापासून ते अगदी संध्याकाळच्या जेवणात सुद्धा अनेक जण याचे सेवन करतात. तर याच ब्रेडपासून अवघ्या काही मिनिटांत बनणारा ‘ब्रेड कस्टर्ड’ हा पदार्थ तुम्ही सहज घरी बनवू शकता ; जो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडेल.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make home made bread custard for summer this sweet dish not this special sweet dish watch video ones asp