पालक आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. त्यामुळे जास्तीत जास्त पालकचा समावेश आहारात करायला हवा, असे आवर्जून सांगितले जाते. अनेक जण पालक पनीर आवडीने खातात, पण पालकची भाजी खाण्याचा कंटाळा करतात. तर तुम्हालासुद्धा पालकची भाजी खाण्याचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही घरच्या घरी ‘हेल्दी पालक राईस’ बनवू शकता आणि आहारात याचा समावेश करू शकता. चला तर पाहूयात हेल्दी पालक राईसची रेसिपी.
साहित्य :
- १ किलो तांदूळ
- पाव किलो मटार
- १० ते १२ पालकची पाने
- पाव किलो फ्लॉवर
- १ गाजर
- आलं
- १० ते १२ लसूण पाकळ्या
- १० ते १२ किंवा आवडीनुसार हिरवी मिरची
- कोथिंबीर
- काळीमिरी, दालचिनी, लवंग, तेजपत्ता
- काजू
- चवीनुसार मीठ
- तेल
हेही वाचा…Banana Milkshake Recipe: केळी खाण्याचा कंटाळा येतो? मग ‘असं’ हेल्दी केळीचे मिल्कशेक करून पाहा
कृती :
- तांदूळ शिजवून घ्या.
- मटार, गाजर, फ्लॉवर भाज्या उकडवून घ्या.
- पालक, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या.
- त्यानंतर फोडणीसाठी एका भांड्यात तेल गरम करून घेणे.
- तेल गरम झाल्यावर त्यात थोडे काजू परतवून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेणे.
- नंतर त्या तेलामध्ये तेजपत्ता, काळीमिरी, लवंग, दालचिनी यांना फोडणी देणे. फोडणी दिल्यानंतर त्यात पालकची तयार करून घेतलेली पेस्ट घालणे आणि परतवून घेणे.
- नंतर त्यात उकडवून घेतलेल्या भाज्या मटार, गाजर, फ्लॉवर घालून घ्या आणि वरून काजू घाला.
- त्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवा.
- नंतर उकडवून घेतलेला भात मिश्रणात घालून त्यात मीठ घाला आणि थोड्या वेळासाठी मंद आचेवर ठेवा.
- तुमचा पौष्टिक ‘पालक, मटार राईस’ तयार.