Laal Mirchicha Thecha: ठेचा-भाकरी खायला तर अनेकांना आवडते. ठेचा असेल तर भरलेल्या जेवणाच्या ताटाची रंगत वाढले. आता पर्यंत तुम्ही हिरव्या मिरच्यांचा ठेचा तुम्ही अनेकदा खाल्लं असेल. पण, तुम्ही कधी लाल मिरच्यांचा ठेचा खाल्ला आहे का ? नाही… तर आज आपण लाल मिरच्यांचा ठेचा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यात व काही मिनिटांत तुम्ही हा ठेचा घरच्या घरी अगदी सहज बनवू शकता. चला तर पाहू नक्की कसा बनवायचा लाल मिरच्यांचा ठेचा. साहित्य व कृती लिहून घ्या.

साहित्य :

१. लाल मिरची
२. लसूण
३. लिंबू
४. मीठ
५. साखर
६. जिरं

हेही वाचा…झटपट होणारी ‘साबुदाण्याची पेज’, उपवासासाठी ठरेल बेस्ट पर्याय; रेसिपी लिहून घ्या लगेच

कृती –

१. मिक्सरच्या भांड्यात लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरं, मीठ, साखर, लिंबाचा रस घाला.
२. त्यानंतर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात एकत्र करा आणि अगदी बारीक मिश्रण तयार करून घ्या .
३. नंतर पॅनमध्ये थोडं तेल घ्या. त्यात थोडं जिरं टाका.
४. नंतर मिस्करच्या भांड्यात बारीक करून घेतलेलं मिश्रण यात घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
५. अशाप्रकारे तुमचा ‘लाल मिरचीचा ठेचा’ तयार.

तुम्हाला एखादी चटपटीत, झणझणीत भाजी खायची असेल तर या लाल मिरचीच्या ठेच्याचा उपयोग तुम्ही इन्स्टंट मसाला म्हणूनही करू शकता. @bornhungrybypayal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही लाल मिरच्यांचा ठेच्याची रेसिपी घेण्यात आली आहे.