जुहू चौपाटीवर गेल्यावर तेथील सुखी किंवा ओली भेळ खाणे म्हणजेच स्वर्ग. शेव, कुरमुरे, कोथिंबीर आणि लिंबू पिळून केलेली ही भेळ पाहताच आपसुकचं तोंडाला पाणी सुटते. तसेच घरी संध्याकाळी भूक लागली असेल, खायला काहीच नसेल. तेव्हा घरात उपस्थित काही मोजक्या साहित्यात ही भेळ अगदी सहज बनवता येते. आतापर्यंत तुम्ही विविध प्रकारच्या भेळ खाल्ल्या असतील. पण, तुम्ही कधी कडधान्यांची पौष्टीक आणि आरोग्यदायी भेळ खाल्ली आहे का ? नाही . तर सोशल मीडियावर एका युजरने १ वाटी उकडलेल्या मूगापासून भेळ कशी बनवायची हे दाखवलं आहे.चला तर पाहू या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य –

Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
loksatta kutuhal facial recognition with artificial intelligence
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवणे १
Improved Energy Levels doctor suggest some hacks
Improved Energy Levels : ऊर्जा, तणाव, झोप ‘या’ गोष्टींवर नियंत्रण कसं ठेवाल? फक्त हे तीन उपाय करा; समजून घ्या डॉक्टरांचा सल्ला…
5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
Pear For Gut Health
Benefits Of Pear Fruit: पेर फळ रोज खाल्ल्यानं कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात? जाणून घ्या
CNG Kit Installation Considerations, CNG Conversion Benefits, CNG Safety Features, CNG Maintenance Tips, CNG Fueling Infrastructure
तुमच्या कारमध्ये CNG किट बसवणार आहात का? थांबा, आधी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या….

एक १ वाटी उकडलेले मूग
१/४ कप कांदा
१/३ कप टोमॅटो
१/३ कप उकडलेला बटाटा
हिरवी मिरची
कोथिंबीर
दोन चमचे शेंगदाणे
रॉक मीठ
चाट मसाला
चिंचेची चटणी
पुदिन्याची चटणी
१/२ कप कुरमुरे
लिंबू
शेव

हेही वाचा…फक्त १ जुडी कोथिंबीरीपासून बनवा अतिशय सोपी व स्वादिष्ट चटणी; साहित्य, कृती लिहून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

गॅसवर एक भांड ठेवा. त्यात एक १ वाटी मूग, रॉक मीठ, हळद आणि कपभर पाणी घाला व थोडावेळ उकळवून घ्या.
नंतर पाणी बाजूला काढून घ्या व एका बाउलमध्ये मूग घ्या. त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो, उकडलेले बटाटे आणि शेंगदाणे घाला.
त्यानंतर कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे,चाट मसाला, रॉक मीठ, पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी व थोडा लिंबाचा रस घाला.
त्यात शेवपुरीची पुरी कुस्करून घाला आणि सगळ्यात शेवटी कुरमुरे घाला.
मिश्रण एकजीव करून घ्या व त्यात शेव आणि कोथिंबीर सजावटीसाठी वरून घाला.
अशाप्रकारे तुमची ‘मूग भेळ’ तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @food.and.frolic या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अक्षदा असे या फूड ब्लॉगरचे नाव असून नवनवीन रेसिपी ती युजर्सबरोबर शेअर करत असते. तर आज युजरने अगदीच पौष्टिक आणि डाएटसाठी फायदेशीर ठरेल अशी मूग भेळ तयार केली आहे ; ज्याचे सेवन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच करू शकतात. ही तयार करणे देखील सोपे आहे आणि नाश्ताच्या वेळी सुद्धा तुम्ही या भेळचे सेवन करू शकतात. मूग पचायला सोपे असे कडधान्य आहे. आयुर्वेदामध्ये आहार म्हणून मूग सर्वश्रेष्ठ सांगितले जाते. १०० ग्रॅम मूग डाळीत सुमारे २४ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी दररोज आहारात निरोगी प्रथिनांचे सेवन करणे महत्वाचे आहे. दररोज बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारी मूगची भेळ बनवून त्याचा आहारात समावेश करू शकता.