महाराष्ट्रासह देशातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक म्हणजे ‘केळी’. पिवळ्या आणि हिरव्या रंगाची केळी बाराही महिने उपलब्ध असतात. केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. कच्च्या केळीसह पिकलेल्या केळीचे सुद्धा अनेक पदार्थ बनवले जातात.तुम्ही आतापर्यंत कच्च्या केळीचे अनेक पदार्थ खाल्ले असतील. वेफर्स,भजी, भाजी आदी. तर आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीत ‘कच्च्या केळ्याचे काप’ कसे बनवायचे हे पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कृती –

दोन कच्ची केळी, १.५ चमचे लाल मिरची पावडर, १/२ चमचे हळद, १ चमचा धने पावडर, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा चाट मसाला, मीठ, चिमूटभर हिंग, एक चमचा आलं लसूण पेस्ट, एक चमचा बेसन, दोन चमचे रवा, चिमूटभर मीठ.

हेही वाचा…१५ मिनिटांत बनवा टेस्टी अन् पौष्टिक ‘अंड्याचे कटलेट’ ; पाहा सोपी रेसिपी…

साहित्य –

  • तुमच्या हाताला थोडं तेल लावून घ्या.
  • कच्ची केळी घ्या व त्याचे साल काढून घेऊन उभे पातळ काप करा.
  • त्यानंतर मिरची पावडर, हळद, धने पावडर, गरममसाला, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट, हिंग, मीठ घालून आदी मसाल्यांच्या मिश्रणात मॅरीनेट करा आणि दहा मिनिटे बाजूला ठेवा.
  • त्यानंतर एका बाऊलमध्ये बेसन, रवा, मीठ घ्या आणि सर्व केळ्याचे काप यात बुडवून घ्या.
  • पॅनमध्ये तेल घ्या आणि शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करा.
  • अशाप्रकारे तुमचे ‘केळ्याचे काप’ तयार.