गायीच्या किंवा म्हशीच्या बाळंतपणानंतर पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून (colostrum) खरवस तयार केला जातो. पण, शहरात आपण दूध विक्रेताला हा चीक आणण्यास सांगतो. हा दूध विक्रेता कधी एक, तर कधी दोन महिन्यांनी हा चीक आणून देतो व आई आपल्याला घरच्या घरी खरवस तयार करून देते. तुम्ही आता पर्यंत, पांढरा-शुभ्र, जाळीदार असा चविष्ट खरवस खाल्ला असेल. पण, तुम्ही कधी गुलाबी खरवस बनवलेला पहिला आहे का? नाही. तर आज आपण ‘गुलाबी खरवस’ कसा बनवायचा हे पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

  • एक कप दूध
  • एक कप दही
  • १/२ कप दूध पावडर
  • ३/५ कप गोड कंडेस्ड दूध
  • एक चमचा गुलाब सिरप
  • एक टीस्पून वेलची पावडर
  • वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या (पर्याय)

हेही वाचा…घरच्या घरी ‘असा’ बनवा मसालेदार अन् पौष्टीक तोंडलीचा भात; पाहा सोपी रेसिपी

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

  • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये दुध ओतून घ्या.
  • यामध्ये एक कप मिल्क पावडर टाकावी.
  • दूध आणि मिल्क पावडर एकजीव झाल्यानंतर त्यात दही , कंडेन्स मिल्क आणि गुलाब सिरप घालावे.
  • मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या किंवा फेटून घ्या.
  • आता हे मिश्रण एका खोलगट ताटात किंवा भांड्यात ओतून घ्या.
  • त्यानंतर त्यावरून वेलची पूड आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आवडीनुसार घालून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन खरवस ठेवलेल्या मिश्रणाचे भांडे त्यावर ठेवावे व वरून झाकण लावावे.
  • गॅसच्या मंद आचेवर हे भांड ठेवून खरवस वाफेवर ३० ते ३५ मिनिटांसाठी शिजवून घ्या.
  • खरवस संपूर्ण शिजवून झाल्यानंतर त्यात सुरीच्या मदतीने तो आतून नीट शिजला आहे की नाही तपासून घ्या.
  • (टीप : खरवस नीट शिजला आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही सुरी किंवा टूथपिकचा सुद्धा वापर करू शकता. सूरी घ्या आणि मिश्रणात रोवून पाहा. जर सुरीवर खरवसाचे मिश्रण चिटकून आले तर ती नीट शिजला नाही असे समजावे. )
  • खरवस वाफेवर शिजवून तयार झाल्यावर तो थोडा गार होऊ द्या . गार झाल्यावर तो फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी १ ते २ तास ठेवा.
  • अशाप्रकारे तुमचा ‘गुलाबी खरवस’ तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @binjalsvegkitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make home made rose kharvas watch viral video and note the recipe step by step asp