[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माणसाचा जन्म कसा झाला, त्याची संख्या एवढी कशी वाढली, त्याचा अन्नाचा शोध कसा लागला, याचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. कुणीकुणी आधी मांडलेले सिद्धांत नंतर कसे चुकीचे होते, हेसुद्धा सिद्ध करणारे नवे सिद्धांत मांडले गेले, त्यावरून भरपूर चर्चा, परिसंवाद झडत राहिले आणि आणखीही अनंत काळ झडत राहतील. चर्चा, परिसंवाद झालेच नाहीत, तर आयुष्यात करायचं काय, असा प्रश्नही एका वर्गापुढे उभा राहू शकतो. तर ते असो. पोटासाठी गरजेच्या अन्नाचा शोध कसा लागला, हे एकवेळ शोधून काढता येईल. पण जिभेसाठीच्या पदार्थांचा शोध कसा लागला असावा, हे शोधणं खरंच अवघड आहे. त्यातून एका पदार्थापासून दुसरा उपपदार्थ करण्याची पाकक्रिया हे एकतर अतिचिकीत्सक व्यक्तीचं काम असावं, किंवा अगदीच रिकामटेकड्या माणसाचं. अर्थात, काहीही असलं, तरी त्यामुळेच वेगवेगळे पदार्थ, उपपदार्थ निर्माण होऊन आधी जिभा आणि नंतर पोटं तृप्त होत राहिली आहेत, हे वास्तव कुणालाच नाकारता येणार नाही. इडली हा असाच एक संशोधनासाठी कायम गिनीपिग म्हणून वापर झालेला प्रकार. मुळात उडदाची डाळ आणि तांदूळ काही तास भिजवायची, ते मिश्रण वाटून पुन्हा काही तास फुगण्यासाठी ठेवायचं, मग ते पाण्याच्या वाफेवर शिजवून त्यापासून इडली तयार करायची, हेच एक मोठं संशोधन. बरं, ही इडली खाण्यासाठी चटणी, सांबार, असला काहीतरी उपपदार्थ तयार करायचा. तेवढ्यानं गप बसवत नाही, म्हणून मग त्या इडलीवरच आणखी वेगवेगळे प्रयोग करायचे आणि त्यातून इडली फ्राय, इडली उपमा, इडली मंचुरियन, असले काहीतरी शोध लावायचे, हा केवढा व्याप! ज्यानं किंवा जिनं कुणी हे प्रयोग केले आणि यशस्वी उपपदार्थांची निर्मिती केली, तो किंवा ती माणूस थोरच असणार. तर, आज बघूया, तुमच्या आवडत्या इडलीपासून तयार होणारा इडली मंचुरियन हा पदार्थ. त्यासाठी लागणारी इडली कशी करायची, हे मात्र प्लीज कुणालातरी विचारून घ्या हां!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य

  • १०-१२ नग तयार इडल्या
  • तीन चमचे कॉर्नफ्लोअर
  • दोन टेबलस्पून मैदा
  • एक चमचा आले-लसणाची पेस्ट
  • तीन चमचे लाल मिरचीचे तिखट
  • बारीक चिरलेली एक सिमला मिरची
  • एक चमचा आल्याचा कीस
  • बारीक चिरलेल्या ३-४ लसणाच्या पाकळ्या
  • पाव चमचा सोया सॉस
  • दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस
  • पाव चमचा काळी मिरीची पूड
  • एक बारीक चिरलेला कांदा
  • एक टेबलस्पून बारीक चिरलेली कांदापात
  • चवीनुसार मीठ.

[/two_thirds]

[one_third]

पाककृती

  • तयार इडल्या अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा व अर्ध्या तासाने फ्रिजमधून काढून त्यांचे छोटे छोटे चौकोनी तुकडे कापून ठेवा.
  • एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, आले-लसणाची पेस्ट, लाल तिखट एकत्र करा.ॉ
  • मिश्रणात पाणी घालून फेटून घेऊन दाट पेस्ट बनवा.
  • गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करा.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये इडलीचे तुकडे बुडवून ते तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या.
  • एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर पसरून त्यात हे टोस्ट केलेले इडल्यांचे तुकडे ठेवा.
  • आता गॅसवर एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून घ्या.
  • त्यात किसलेले आले, बारीक चिरलेला लसूण व कांदा घालून 3-4 मिनिटे मध्यम आचेवर कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.
  • मग त्यात चिरलेली सिमला मिरची घालून परता.
  • सिमला मिरची शिजून मऊ झाली की त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लोअरचे मिश्रण आणि मीठ घालून एकजीव करा व परतत रहा.
  • थोडेसे पाणी घालून ढवळत रहा.
  • जेंव्हा  मंचूरियन सॉसमध्ये उकळी येईल  तेंव्हा त्यात इडली व काळी मिरीची पूड घालून एकजीव करून घ्या आणि आणखी २-३ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा. गरम इडली मंचूरियन फ्राइड राईससोबत सर्व्ह करा.

[/one_third]

[/row]