Indian Sweet Bread : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्वीट ब्रेड आवडतात. अनेकदा आपण स्वीट ब्रेड हे विकत आणत असतो पण दुकानातून आणलेल्या ब्रेडपेक्षा घरी बनवलेले ब्रेड हे जास्त पौष्टीक असतात. आता तुम्हीही घरीच इंडियन स्वीट ब्रेड बनवू शकता. तुम्हाला हे स्वीट ब्रेड घरी कसे बनवायचे, हे माहिती आहे का? चला तर ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य –
- २ कप मैदा
- अर्धा कप पिठीसाखर
- पाव चमचा मीठ
- १ मोठा चमचा तेल
- दोन तृतीयांश कप पाणी
हेही वाचा :Wheat Biscuits : गव्हाच्या पीठापासून बनवा पौष्टिक खुसखुशीत बिस्किटे, रेसिपी नोट करा
कृती –
- एका भांड्यात मैदा, मीठ आणि पाणी एकत्र मळून घ्या.
- पिठाचे लहान-लहान गोळे तयार करून घ्या.
- त्यावर ओले कापड ठेवून प्लास्टिकने झाकून ठेवा.
- एक गोळा घेऊन पातळ पोळी लाटून घ्या.
- त्यावर पिठीसाखर भुरभुरवा.
- पिठीसाखर लागलेली पोळी चौकोनी आकारात मोडून घ्यावी व पुन्हा पातळ लाटा.
- लाटलेल्या पोळीला थोडे तेल लावून पराठ्यासारखे तव्यावर भाजून घ्या.