Sweet Corn Paratha: मार्केटमध्ये मका दिसला की आई लगेच खरेदी करते. मग पौष्टीक असा हा मका सोलून त्याचे दाणे काढून उकडवून घेते. अनेकदा आपण उकडलेल्या मक्याच्या दाण्यांमध्ये चाट मसाला टाकून खातो. तर काही गृहिणी मक्याची भजी, मक्याचा उपमा, मक्याचा ढोकळा आदी अनेक पदार्थ बनवता. तर आज आपण थोडं वेगळं ‘मक्याचा पराठा’ कसा बनवायचा हे पाहणार आहोत. चला तर पाहू मक्याचा पराठा कसा बनवायचा ते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य –

१. एक कप उकडलेले मक्याचे दाणे
२. १/४ कप बेसन
३. एक चमचा चिली फ्लेक्स
४. १/२ चमचा धणे पूड
५. १/२ चमचा लाल मिरची पावडर
६. एक चमचा चाट मसाला
७. १/२ चमचा जिरे पावडर (Roasted)
८. १/४ चमचा गरम मसाला
९. एक चमचा किसलेलं आलं
१०. दोन ते तीन हिरव्या मिरच्या
११. एक कांदा
१२. कोथिंबीर
१३. गव्हाचे पीठ
१४. ओवा
१५. मीठ

हेही वाचा…झटपट होणारी ‘साबुदाण्याची पेज’, उपवासासाठी ठरेल बेस्ट पर्याय; रेसिपी लिहून घ्या लगेच

कृती –

१. उकडलेल्या मक्याच्या दाण्यांना बारीक करून पेस्ट करून घ्या.
२. त्यानंतर एका बाउलमध्ये मक्याच्या दाण्याची बारीक केलेली पेस्ट, बेसन, चिली फ्लेक्स, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, चाट मसाला, जिरे पावडर, गरम मसाला, मीठ, किसलेलं आलं, कांदा, कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
३. त्यानंतर गव्हाचे पिठ घ्या. त्यात मीठ व ओवा घाला.
४. त्यानंतर कणिक मळून घ्या व त्याचे छोटे गोळे करून घ्या.
५. पिठाचा गोळा लाटण्यापूर्वी त्याला थोडी कोथिंबीर आणि पीठ लावा.
६. त्यानंतर पोळी लाटून घ्या व मधोमध्ये मक्याचे तयार केलेलं सारण त्यात भरा.
७. सारण त्रिकोणी आकारात पसरवून घ्या व पोळी सुद्धा त्रिकोणी आकारात बंद करा आणि व्यवथित लाटून घ्या.
८. त्यानंतर पराठा तेल किंवा बटर लावून व्यवस्थित शेकून घ्या.
९. अशाप्रकारे तुमचा ‘मक्याचा पराठा’ तयार.

ही रेसिपी सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम ॲपवरील @chandni_foodcorner या अकाउंटवरून घेण्यात आली आहे. मक्यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. मका खाल्ल्यानं उर्जा टिकून राहण्यास मदत होते. तसेच मक्याचे कणीस जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध असतात. तसेच मक्यातील व्हिटॅमिन ए रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. तर आरोग्यदायी फायद्यांनी भरपूर मक्याचा तुम्ही पौष्टीक, मसालेदार पराठा बनवा आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला द्या.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make indian sweet corn parotta or paratha not down the healthy tasty and spicy recipe in marathi asp
Show comments