उन्हाळा जवळ येत आहे. उन्हाळ्यात पापड बनवण्याची पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. उन्हाळा सुरू झाला की घरातील स्त्रिया पापड बनवण्याच्या तयारीला लागतात. पापड अनेक प्रकारचे बनवले जातात. उन्हाळ्यात तयार केलेले पापड अगदी वर्षभर टिकतात. तुम्ही अनेक प्रकारचे पापड बनवले असतील. पण आज आम्ही तुम्हाला हेल्दी आणि आरोग्याला फायदेशीर असे ज्वारीचे पापड कसे बनवावे याबाबत सांगणार आहोत. हे पापड अगदी कुरकुरीत आणि चविष्ठ असतात. चला तर मग जाणून घेऊया ज्वारीचे पापड बनवण्याची रेसिपी..
साहित्य
- ज्वारीचे पीठ अर्धा किलो
- मिरची पावडर ४ चमचे
- जिरे २ चमचे
- मीठ चवीनुसार
- पाणी अडीच लीटर
( हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा ‘मिक्स डाळींचं खमंग थालीपीठ’, विकेंड बनेल खास!)
कृती
प्रथम ज्वारीचे पीठ चाळून घ्या. गॅसवरती पातेल्यात पाणी घेऊन ते चांगले उकळा. ज्वारीचे पीठ व्यवस्थित मिसळा, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. त्यानंतर त्यात मीठ, मिरची पूड, जिरे घालून मिश्रण साधारण ५ ते १० मिनिटे चांगली पातळ पेस्ट होईपर्यंत शिजवा. हे शिजवलेले मिश्रण पळीच्या साहाय्याने घेऊन कापडावर किंवा प्लास्टिकच्या कागदावर गोलाकार पापड पसरवा आणि उन्हामध्ये वाळलेले पापड नंतर गोळा करून हवाबंद डब्यात त्यांची साठवण करा.