How to make kadak chai like Tapri: अनेक चहाप्रेमींना टपरीवरचा चहा प्यायला खूप आवडतो. लोक आपल्या आवडीच्या टपरीवर चहा पिण्यासाठी दूरपर्यंत जातात. पण, जेव्हा काही कारणास्तव तुम्हाला टपरीवरचा चहा पिण्यासाठी जाता येत नाही. अशा वेळी तुम्ही टपरीसारखा चहा घरी सहजतेने बनवू शकता. त्तुम्ही काही टिप्स फॉलो केल्यास हे काम सहजतेने करू शकता.
टपरीसारख्या चहाच्या सीक्रेट रेसिपीसाठी लागणारे साहित्य :
- पाणी
- चहा पावडर
- वेलची
- आलं
- लवंग
- तमालपत्र
- साखर
- दूध
टपरीसारखा कडक चहा कसा बनवायचा?
- कडक चहा बनवण्यासाठी प्रथम पॅनमध्ये थोडे पाणी घाला.
- नंतर वेलची, लवंगा, आले व तमालपत्र बारीक करून तयार करा आणि नंतर ते पाण्यात टाकून चांगले उकळवा.
- पाणी उकळू लागल्यावर त्यात चहाची पावडर आणि साखर घाला.
- हे पाणी चांगले उकळवा आणि नंतर त्यात दूध घाला.
- चहा चांगला उकळा आणि नंतर गाळून प्या.
(टीप : टपरीच्या चहाची खास गोष्ट म्हणजे त्यात वेलची ठेचून, ती वेलची पूर्णपणे उकळवून तयार केली जाते. त्यामुळे तो चहा घरच्या चहाच्या तुलनेत अधिक चविष्ट लागतो)