सध्या उन्हाळा सुरु आहे. बाजारमध्ये आता चांगले आंबे आणि कैऱ्या मिळू लागले आहेत. अशा हिरव्यागार कैरीचे फक्त लोणचे किंवा पन्हे नव्हे तर चटपटीत सारदेखील बनवून पाहा. चवीला आंबट-गोड असणारे हे सार कसे बनवाचे याची खूप सोपी रेसिपी युट्यूबवरील vmiskhadyayatra103 नावाच्या चॅनलने शेअर केली आहे. चला तर मग, यंदाच्या कैरीच्या मौसमात आपण कैरीचे सार कसे बनवाचे ते शिकू.

कैरीचे सार रेसिपी :

साहित्य
कैरी
बेसन – २ चमचे
मीठ
तेल – १ चमचा
मेथी दाणे – १० ते १२
मोहरी
जिरे
हिंग
हळद
लाल मिरच्या सुक्या – ४ ते ५
कढीपत्ता
लाल तिखट
पाणी – ५ वाट्या

हेही वाचा : Recipe : थंडगार चटपटीत ‘मसाला पन्हे’! कैरीच्या सरबताला ‘असा’ द्या मिरचीचा ठसका…

कृती

  • सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून चिरून घ्या. चिरलेल्या कैऱ्या कुकरमध्ये शिजवून घ्या.
  • आता एका पातेल्यामध्ये तेल तापण्यासाठी ठेवा. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मेथी दाणे तांबूस होईपर्यंत परतून घ्या.
  • पाठोपाठ कढीपत्ता, लाल कोरड्या मिरच्या, मोहरी आणि जिरे घालून सर्व गोष्टी तडतडू द्यावे.
  • नंतर फोडणीमध्ये हिंग, हळद घालून घ्यावे.
  • आता पातेल्यामध्ये शिजवलेल्या कौरीच्या फोडी टाकून त्या ढवळून घ्या. त्यामध्ये पाच वाट्या पाणी घालून घ्यावे.
  • तयार होणाऱ्या सारामध्ये चवीपुरते मीठ आणि थोड्या पाण्यात २ चमचे घोळवून घेतलेल्या डाळीच्या पिठाचे मिश्रण घालून, सार ढवळून घ्या.
  • तसेच साराला खमंग, तिखटसर चव यावी यासाठी एक चमचा तिखट घाला.
  • कैरीच्या साराच आंबटपणा घालवण्यासाठी पातेल्यामध्ये अर्धी वाटी गुळ घालून कैरीच्या साराला उकळी येईपर्यंत ते ढवळत राहावे.
  • साराला उकळी आली कि पातेल्याखालील गॅस बंद करून, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
  • तयार आहे आपले कैरीचे आंबट-गोड आणि चटपटीत सार.
  • हे सार भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा सूप प्रमाणे खाल्ले जाऊ शकते.

टीप –

१. कैरीच्या फोडी आणि गुळ हे समप्रमाणात असावे.
२. कैरीच्या साराला घट्टपणा येण्यासाठी डाळीच्या पिठाचे मिश्रण घालावे.
३. कैरीच्या साराला आंबटपणा अधिक असल्यास गुळाचे प्रमाण वाढवावे.

युट्युबवरील @vmiskhadyayatra103 नावाच्या चॅनलने या कैरी साराची आंबट-गोड रेसिपी दाखवली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर यंदाच्या उन्हाळ्यात एकदा नक्की बनवून पाहा.

Story img Loader