खवा, पेढे, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ यात भेसळ होतेच. त्यामुळे असा कोणताही पदार्थ सणासुदीच्या काळात विकत आणायला जरा भीती वाटतेच. म्हणूनच ही एक रेसिपी बघून घ्या. कलाकंद हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. दूध कधी आपण फ्रिजमध्ये ठेवायचं विसरलो तर दूढ फाटते, मात्र हे फाटलेलं दूध फोकू देऊ नका. या दुधापासून तु्ही स्वादिष्ट अशी मिठाई बलवू शकता. रेसिपी अगदी सोपी आहे आणि शिवाय पटकन होणारी आहे. चला तर मग पाहुयात कलाकंद कसा बनवायचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलाकंद साहित्य –

  • २ टेबलस्पून मिल्क पावडर
  • ४०० ग्रॅम कंडेन्स मिल्क
  • अर्धा किलो पनीर
  • चवीनुसार वेलची पावडर आणि वरुन टाकायला बदाम, पिस्ता असा सुकामेवा.

कलाकंद कृती –

  • सगळ्यात आधी एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क टाका.
  • मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क व्यवस्थित हलवून घ्या. त्याचा रंग थोडा बदलू लागला आणि ते थोडं घट्ट झालं की त्यात पनीर क्रश करून टाका.
  • हे सगळं मिश्रण पुन्हा व्यवस्थित हलवून घ्या आणि मंद ते मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे शिजू द्या.
  • त्यानंतर त्यात थोडीशी विलायची पावडर टाका. एका ताटाला तुपाचा हात फिरवा आणि हे गरमागरम मिश्रण त्यावर टाकून ते एकसारखं ताटभर पसरवा.
  • आता ताटातलं मिश्रण थोडं थंड झालं की ताट एक ते दोन तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
  • त्यानंतर कलाकंद छान जमून येईल आणि त्याच्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडता येतील.

हेही वाचाहेल्दी आणि टेस्टी ‘खजूर हलवा’! कॅलरीज वाढण्याचीही चिंता नाही, एकदा नक्की ट्राय करा..

बहुतेक लोक फाटलेल्या दुधाचे पाणी फेकून देतात, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की याच्या पाण्यात भरपूर प्रोटीन असते. त्याचे पाणी आजच आपल्या आहाराचा भाग बनवा आणि आपले शरीर निरोगी ठेवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make kalakand recipe at home kalakand with milk marathi recipe mithai recipe in marathi srk