[content_full]

पुन्हा एकदा मोठ्या सुट्या, वर्षअखेर आणि नव्या वर्षाच्या स्वागताचे वेध सगळ्यांना लागले आहेत. या सुटीत कुठे फिरायला जायचं, 31 डिसेंबरची पार्टी कुठे साजरी करायची, नवीन वर्षाचं प्लॅनिंग कसं करायचं, याची जोरदार तयारी सुरू आहे. काही जण तर प्लॅनिंग करून आपापल्या इच्छित स्थळी गर्दी वाढवण्यासाठी रवानाही झाले आहेत. काहीजणांनी नेहमीच्या शिस्तीप्रमाणे महिना दोन महिने आधीच सगळं बुकिंग करून ठेवलं आहे. नोटाबंदीच्या समस्येचाही त्यांच्यावर परिणाम झालेला नाही. खरंतर हिवाळा हा ऋतूच असा आहे, की या काळात कुठल्याही ठिकाणी फिरायला गेलं, तरी चालू शकतं. पावसाळा किंवा उन्हाळ्यात ही बंधनं लागू असतात. म्हणजे पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडणाऱ्या ठिकाणी जाणं जरा कठीण असतं. डोंगराळ भागात गेलं, तर पाऊस, वाहतूक कोंडी, रस्ते बंद पडण्याचा धोका असू शकतो. उन्हाळ्यात रखरखीत प्रदेशात गेलं, तर त्रास होऊ शकतो. हिवाळा मात्र सगळ्या प्रकारच्या प्रदेशांवर सारखंच प्रेम करतो. तर, अशा हिवाळ्यात एखाद्या छानशा ठिकाणी जावं. समुद्रकिनारा वगैरे असेल, तर उत्तम. मांसाहार प्रेमींसाठी समुद्रकिनाऱ्याची ठिकाणं खाण्याची खूप मोठी पर्वणी घेऊन येतात. शांत, निवांत समुद्रकिनारा, बरोबर आपली जवळची मंडळी, मनसोक्त गप्पा आणि हातात आवडीचा पदार्थ, म्हणजे अक्षरशः स्वर्गसुख. अगदीच बाहेर कुठे जायला जमलं नाही, तर निदान आपल्या घरी एखादी निवांत संध्याकाळ निवडावी. गॅलरीत किंवा गच्चीत बसावं आणि आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर काश्मिरी मटण चॉप्सचे तुकडे तोडावेत. अर्थात, त्यासाठी आधी या पदार्थाची रेसिपी शिकून घ्यायला लागेल. हो ना? चला, बघूया.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १० चॉप्स बेस्ट
  • ६ हिरवी वेलची
  • २ चमचे बडीशेप
  • ५ लवंगा
  • २ मध्यम दालचिनीचे तुकडे
  • ४ कप दूध
  • अर्धा वाटी बेसन
  • पाव वाटी मिरचीपूड
  • अर्धा चमचा हिंग
  • १ लिंबाचा रस
  • अर्धा कप तूप

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • प्रथम वेलची, लवंग, दालचिनी आणि बडीशेप एका कापडाच्या तुकड्यात बांधून त्याची पुरचुंडी करा.
  • मोठ्या पसरट पातेल्यात चॉप्स घालून त्यात दूध, अर्धा लिटर पाणी आणि ही मसाल्याची पुरचुंडी घालून ४० मिनीटे मध्यम गॅसवर चॉप्स शिजेपर्यंत व पाणी आटेपर्यंत ठेवा.
  • चॉप्स शिजत असतानाच बेसन व तांदळाचे पीठ, थोडे पाणी घालून भाज्याच्या पिठासारखे भिजवा.
  • पिठामध्ये मीठ, लाल मिरचीपूड, हिंग घालून फेटा.
  • शिजलेले मटण चॉप्स खाली उतरवून जरा थंडा करा.
  • कढईत तूप तापवून त्यात चॉप्स पिठात घालून हलकेच सोडा व सोनेरी रंगावर तळून घ्या.
  • गरमागरम काश्मिरी मटण चॉप्स चटणी वा सॉससोबत सर्व्ह करा.

[/one_third]

[/row]