How To Make Kharvas: खरवस सगळ्यांनाच खायला फार आवडतो, पूर्वी आसपासच्या गोठ्यातील गाय, म्हैस जेव्हा विणार आहे, असं कळलं की, आपल्याला चिक मिळावा, यासाठी लोकांची फार गडबड उडायची. सगळ्यांचे डोळे गाय किंवा म्हशीच्या बाळंतपणाकडे लागायचे. परंतु, शहरात आपण चिक आणण्यासाठी दुधवाल्याला सांगतो. तो कधी तरी महिना, दोन महिन्यांनी चीक आणून देणार, मग आपण खरवस तयार करणार. तोपर्यंत आपली खरवस खाण्याची इच्छा हमखास कमी होऊन जायची. पणा आता चिंता करु नका कारण चिकाच्या दुधाशिवाय मऊ जाळीदार खरवस कसा बनवायचा याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला र मग पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • दूध – १ कप
  • मिल्क पावडर – १ कप
  • दही – १ कप
  • कंडेन्स मिल्क – १ कप
  • वेलची पूड – १ टेबलस्पून
  • अल्युमिनियम फॉईल – १ छोटा तुकडा
  • पाणी – गरजेनुसार

कृती –

  • सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये दूध ओतून घ्यावे.
  • या दुधामध्ये एक कप मिल्क पावडर घालावी.
  • दुधामध्ये मिल्क पावडर घातल्यानंतर चमच्याच्या मदतीने ही दूध पावडर दुधामध्ये संपूर्णपणे विरघळवून घ्यावी.
  • दूध आणि मिल्क पावडर एकजीव झाल्यानंतर त्यात दही ओतावे. दही ओतल्यावर या मिश्रणात ते एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यावे.

हेही वाचा >> पंढरपूरची प्रसिद्ध चमचमीत झणझणीत बाजार आमटी; ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

  • त्यानंतर या तयार झालेल्या मिश्रणात कंडेन्स मिल्क घालावे. हे सगळे मिश्रण आता एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यावे.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make kharvas without chik milk kharvas recipe in marathi srk