Kobi Bhaji : पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या या वातावरणात गरमा गरम खावसं वाटते. अनेकजण पावसाचा आनंद घेताना भजींचा बेत आखतात. जर तुम्हालाही पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर कुरकुरीत भजी खायची असेल तर तुम्ही कोबीची भजी ट्राय करू शकता. चला तर जाणून घेऊ या ही कोबी भजी कशी बनवायची?
साहित्य –
कोबीचे तुकडे
बेसन पीठ
आलं लसूण पेस्ट
लाल तिखट
मीठ
ओवा
सोडा
कोथिंबीर
तळणीसाठी तेल
हेही वाचा : ट्राय करा एग रोलचा नवा प्रकार, जाणून घ्या पेस्टो एग रोल कसा बनवायचा?
कृती –
कोबीचे लहान लहान तुकडे करावे.
आणि मीठ टाकलेल्या गरम पाण्यात भिजवून ठेवावेत.
एका भांड्यात बेसन पिठ घ्यावे, त्यात आल लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, ओवा टाकावा.
पाणी घालून पिठ भिजवून घ्यावे.
नंतर कोबीचे तुकडे पून्हा धूवून घ्यावे आणि पिठात घालावेत.
गरम तेलात भजी सोडावीत. गरमा गरम तयार कोबीचे पकोडे तयार होणार