How To Make Kobi Paratha : फास्टफूड खायला आवडत नाही असा आपल्यातील एकही जण शोधून सापडणार नाही. कोणत्याही चायनिज सेंटरमध्ये गेले की, कोबीशिवाय त्यांचा एकही पदार्थ बनत नाही. चायनीज भेळ, कोबी मंचुरियन, पनीर टिक्का, चिकन चिली ते चायनीज भेळीस आदी अनेक पदार्थ कोबीसह उपलब्ध असतात. तसेच घरामध्येही केव्हा केव्हा स्पेशल मेनू असो किंवा साधी भाजी कोबी हजेरी लावतेच. तर मंडळी या कोबीचे अनेक आरोग्यदाई फायदे आहेत. पण, तुम्हाला नेहमीची कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्हाला पौष्टीक आणि टेस्टीही खायचे असेल तर तुम्ही कोबीचे पराठे बनवा (Kobi Paratha). पराठे बनवण्यासाठी काय साहित्य लागेल जाणून घेऊ…
साहित्य (Kobi Paratha Ingredients )
पाव किलो कोबी
एक बटाटा
एक कांदा
लसूण
आलं
हळद
मसाला
गरम मसाला
मीठ
बेसनचे पीठ
तेल
कृती ( How To Make Kobi Paratha)
मार्केटमधून पाव किलो कोबी आणा. (कोवळे कोबी घ्या. कारण – पराठे छान होतात)
कोबी आणि बटाटा किसून घ्या
किसल्यानंतर स्वछ धुवून घ्या.
कांदा बारीक चिरून घ्या.
दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात लसूण (चार पाकळ्या), आलं, हळद, मसाला, गरम मसाला, मीठ, बारीक चिरून घेतलेला कांदा घाला आणि बारीक करून घ्या.
कढईत दीड चमचा तेल टाका.
मिक्सरद्वारे बारीक करून घेतलेले मिश्रण तेलात ओता आणि मिश्रण एकजीव करा.
थोडं लालसर झालं की, कोबी, बटाटा त्यात घाला आणि थोडावेळ वाफवून घ्या. (पाणी आजिबात टाकू नका).
एक मिनिटाने लगेच बंद करा.
परातीत दोन वाट्या पीठ घ्या.
वाफवून घेतलेले मिश्रण पिठात मिक्स करा आणि त्यात थोडे बेसनचे पीठ घाला.
पीठ मळून घ्या आणि पाच मिनिटे तसेच ठेवून द्या.
नंतर पोळ्या लाटा आणि तूप किंवा तेल लावून भाजून घ्या.
अशाप्रकारे तुमचे कोबीचे पराठे तयार (Kobi Paratha).
कोबी खाण्याचे आरोग्यदायी फायदे
कोबीमध्ये असणारे फायबर हे आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. कोबी ही कमी-कॅलरी, कमी चरबीयुक्त भाजी आहे, त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. कोबीमधील फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरल्याचे भासवते त्यामुळे सतत भूक लागत नाही. त्याचप्रमाणे बद्धकोश, पोटफूगी, पोटदुखी, गॅस असे प्रकार कमी होतात.