[content_full]

“आई, आज जेवायला काय आहे?“ भरपूर खेळून दमूनभागून घरी आलेल्या श्रावणीनं दारातच प्रश्न केला. “तुझ्या आवडीचा वरणभात!“ आईनं उत्तर दिलं. श्रावणी आनंदानं उड्या मारेल, अशी तिला अपेक्षा होती. पण आपल्याला अपेक्षित वागतील, ती मुलं कसली? “काय गं रोजरोज वरणभात? आज काहीतरी वेगळं कर ना!“ श्रावणी कुरकुरली. आता या वेळी वेगळं काय करणार? आईला प्रश्न पडला. तरीही तिनं एकदा अंदाज घेऊन बघितला, की आपल्या लाडकीला नेमकं काय हवंय. आता आयत्यावेळी वेगळं काही करणं शक्य नव्हतं, तरीही तिचा मूड आणायला एवढं करायला काही हरकत नव्हती. “आत्ता दुसरं काहीही मिळणार नाहीये हां!“ दुसरा काहीच इलाज चालत नाही म्हटल्यावर आईनं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. “`मला भात हवाच आहे, पण त्याच्यावर वरण नकोय.“ श्रावणीच्या विचारांमध्ये स्पष्टता होती. “आमटी करू का, फोडणी देऊन?“ आईनं एकदम भारी आयडिया सुचल्यासारखं सांगितलं, पण श्रावणीनं त्या कल्पनेलाही थेट नकार दिला. “मागे आपण कोकणात आजीकडे गेलो होतो, तेव्हा तिनं केलं होतं तशी काळी, आंबट आमटी कर ना!“ श्रावणीनं फर्माईश नोंदवली. काळी आंबट आमटी? आईला काहीच टोटल लागेना. बराच खल केल्यानंतरही तिला उलगडा होईना. कोकणात आपण नेमके कधी गेलो होतो, तेव्हा श्रावणीच्या आजीनं काय केलं होतं, त्यातलं काय श्रावणीला आवडलं होतं, याच्यावरून तिनं मेंदूतली हार्ड डिस्क बराच वेळ सर्च करून पाहिली, पण काही उत्तर मिळेना. मध्येच श्रावणीच्या वडिलांनाही फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी `बिझी आहे, दोन मिनिटांत फोन करतो,` असं सांगितलं, तेव्हाच ते दोन तास फोन करणार नाहीत, हे निश्चित झालं होतं. स्वयंपाकघरात उगाच घुटमळायचं म्हणून घुटमळताना आईला एकदम आमसुलांची बरणी दिसली आणि तिला कोकणात प्यायलेलं आमसुलाचं `कळण` आठवलं. म्हणजेच, `कोकम रसम!` बघा, तुम्हीसुद्धा करून!

Kaju katli recipe diwali special Kaju katli at Home easy recipe
Kaju Katli Recipe: दिवाळी स्पेशल ‘काजू कतली’ बनवायचीय? मग घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने ट्राय करा रेसिपी
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Diwali Faral Recipe Shankarpale
Diwali Faral Recipe : तोंडात टाकताच विरघळेल अशी खुसखुशीत बिस्किट शंकरपाळी! जाणून घ्या सोपी रेसिपी
How To Make Coconut Jaggery Barfi
Coconut Jaggery Barfi : यंदा दिवाळीत बनवा तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी? नक्की ट्राय करा ‘ही’ रेसिपी; अगदी कमी मेहनत लागेल
spicy potato thecha
बटाट्याच्या झणझणीत ठेचा नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
Pokala Bhaji recipe in marathi how to make ranbhaji Pokala Bhaji poklyachi Bhaji recipe in marathi
पोकळ्याची भाजी आणि देठी; पौष्टिक अन् चवदार भाजी; ही घ्या सोपी रेसिपी
Kanda Zunka Recipe
Kanda Zunka Recipe : झणझणीत कांद्याचा झुणका असा बनवा, सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
instant rice thalipeeth
झटपट होणारे तांदळाचे थालीपीठ नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती..

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • ५-६ आमसुले (किंवा एक वाटी कोकम आगळ)
  • अर्धा चमचा काळीमिरी पावडर
  • एक टेबलस्पून साजूक तूप
  • अर्धा चमचा जिरे
  • एक हिरवी मिरची
  • १०-१२ कढीपत्त्याची पाने
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ व गरजेप्रमाणे पाणी.

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • अर्धा तास आगोदर ५-६ आमसुले गरम पाण्यात भिजत घालून ठेवा. थोड्या वेळाने ती मऊ झाली की हाताने दाबून व पिळून त्यातील अर्क पाण्यात काढून घ्या व चोथा बाजूला काढून ठेवा.
  • गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तूप तापवून घ्या, त्यात जिरे टाका व ते चांगले तडतडल्यावर मग त्यात कोकमचा काढून ठेवलेला अर्क घाला.
  • दीड कप पाणी, चवीनुसार मीठ, कढीपत्त्याची पाने व बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून एक उकळी येऊ द्या. गॅस मंद करून १० मिनिटे उकळत ठेवा. सगळे मसाले चांगले एकजीव होऊ द्या.
  • आता त्यात एक चमचा गूळ घालून मिक्स करा, गूळ पूर्ण विरघळू द्या.
  • बारीक चिरलेली कोथिंबीर, काळी मिरी पूड घालून चांगले एकजीव करून भातासोबत सर्व्ह करा. नुसतं भुरकायलाही छान लागतं ते.

[/one_third]

[/row]