How To Make Bhadang Recipe In Marathi : कोल्हापूर म्हंटल की, डोळ्यासमोर येत प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल, तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ आणि येथील अनेक पर्यटन स्थळे. कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील महाराष्ट्राचे एक महत्वाचे ठिकाण आहे. तांबडा-पांढरा रस्सा बरोबरच येथील अनेक पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे झणझणीत, चटपटीत ‘भडंग’ (Kolhapuri Bhadang). गरमागरम चहाबरोबर, संध्याकाळची छोटी भूक भागवण्यासाठी, तर ऑफिसमध्ये भूक लागल्यावर काहीतरी पोटभर खाण्यासाठी मसालेदार, झणझणीत सगळ्यांना खावंसं वाटतं असतं. तर तुम्हाला सुद्धा संध्याकाळची छोटी भूक भागवायची असेल तर तुम्ही कोल्हापूरी स्टाईल भडंग अगदी १० मिनिटांत घरच्याघरी बनवू शकता. भडंग बनवण्यासाठी काय साहित्य लागेल चला जाणून घेऊ…
भडंग बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Kolhapuri Bhadang Ingredient)
कुरमुरे
पाव किलो शेंगदाणे
कडीपत्ता
लसूण
तिखट मसाला
हळद
मिठ
तेल
हेही वाचा…Kothimbir Vadi : एक जुडी कोथिंबीरची करा वडी! ‘या’ टिप्स फॉलो केलात तर अगदी कुरकुरीत होईल
कसा बनवायचा कोल्हापूरी स्टाईल भडंग? (How To Make Kolhapuri Style Bhadang)
दुकानातून १० ते १५ रूपयांचे कुरमुरे विकत आणा.
एका कढईत तेल घ्या अंडी त्यात पाव किलो शेंगदाणे भाजून घ्या.
नंतर त्यात कडीपत्ता (१० ते १५ पाने) टाका.
लसूण, तिखट मसाला, हळद, मिठ मिक्सरमध्ये जाडसर बारिक करून घ्या. (टीप – लसूण सालीसह टाका).
नंतर हे मिश्रण तेलात टाका.
परतवून घ्या आणि मग त्यात कुरमुरे घाला.
अशाप्रकारे तुमचा ‘कोल्हापूरी स्पेशल भडंग’ तयार (Kolhapuri Bhadang).
किती दिवस भडंग खराब होणार नाही? (Kolhapuri Bhadang)
सध्या बाजारात वेगेवेगळ्या प्रकारचे भडंग उपलब्ध आहेत. पण, घरी बनवलेल्या भडंगची चव काही वेगळीच असते. त्यामुळे घरच्या घरी अगदी दहा मिनिटांत भडंग बनवा. हा भडंग तुम्ही बनवल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा. १५ ते ३० दिवस भडंग अगदी व्यवस्थित राहील. त्यामुळे तुम्ही हा भडंग प्रवासात सुद्धा खायला घेऊन जाऊ शकता किंवा ऑफिसला जाणाऱ्या किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. म्हणजे त्यांना संध्याकाळी भूक लागल्यावर दुकानातले चिप्स घ्यायची गरज भासणार नाही.