कोकणातील पदार्थ म्हंटले कि सगळ्यात पहिले आपल्यासमोर मासे, माश्याचे कालवण, फिश फ्राय, फिश करी असे पदार्थ चटकन येतात. परंतु हे पदार्थ केवळ मांसाहार करणाऱ्यांनाच खाता येतात. मात्र, सध्या अनेकजण मांसाहार सोडून व्हीगन आहाराकडे वळत आहेत. व्हीगन आहारामध्ये, प्राण्यांपासून तयार होणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा, उदाहरणार्थ – अंडी, मांस, दूध,चीज इत्यादी गोष्टींचा वापर केला जात नाही. अशात या चमचमीत फिश करीचा आस्वाद घ्यायचा असल्यास काय करता येईल?

याचे उत्तर इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @pawar_omkar या अकाउंटने आपल्या, व्हेज फिश करी रेसिपीमधून दिले आहे. वाटण वगैरे वापरून जशी आपण फिश करी बनवतो; अगदी त्याच पद्धतीने ही व्हेज फिश करी वापरली जाते. फक्त यामध्ये मासे घालण्याऐवजी केळ्यांचा वापर केला आहे. तर काय आहे या पदार्थाची रेसिपी पाहा.

Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
paneer makana tikki recipe
पनीरची नवी रेसिपी ट्राय करायचीय? अवघ्या काही मिनिटांत करा ‘पनीर मखाना टिक्की’
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी

हेही वाचा : Recipe: लहान मुलांपासून, मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल ‘ही’ चिक्की! काय आहे रेसिपी अन् प्रमाण पाहा….

व्हेज फिश करी रेसीपी :

साहित्य

३ कच्ची केळी
१/४ चमचा [tsp] हळद
१/२ चमचा [tsp] धणे पावडर
१/२ चमचा [tsp] गरम मसाला
२ चमचे [tsp] तिखट
मीठ
लिंबाचा रस
१ चमचा कोर्नफ्लोर
तेल

ग्रेव्ही साहित्य:
५० ग्रॅम खोबरं
८ लसूण पाकळ्या
१ टोमॅटो
१ कांदा
१० कोरड्या मिरच्या
२ चमचे [tsp] धणे पावडर
१/२ चमचा [tsp] हळद
१ चमचा [tsp] फिश मसाला
बारीक चिरलेली कोथिंबीर

हेही वाचा : कधी हिरव्या मिरचीच्या गोड हलव्याबद्दल ऐकलेय का? विचार नको; पाहा ‘ही’ रेसिपी करून….

कृती

सर्वप्रथम कच्च्या केळ्यांची साले सोलून घ्यावी. नंतर, सर्व सोललेली केळी तिरकी कापून घ्यावी.
स्ट्रॉच्या मदतीने केळ्याच्या मधला भाग काढून सर्व काप पाण्याने धुवून घ्या.
आता एका बाऊलमध्ये केळ्याचे काप घालून त्यामध्ये हळद, तिखट, धणे पावडर, गरम मसाला, कोर्नफ्लोर, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व गोष्टी हाताने कालवून घ्या.
एका पॅनमध्ये तेल तापवून त्यामध्ये केळ्याचे सर्व काप खरपूस परतून घ्यावे.

आता फिश ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहू

मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण, लाल कोरड्या मिरच्या, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो घालून घ्यावे. यासोबतच तिखट, हळद, धणे पावडर, फिश मसाला, मीठ घालून घेऊन सर्व पदार्थ वाटून घ्यावे. ग्रेव्हीसाठी लागणारे वाटण तयार आहे.

पुन्हा पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये तयार वाटण परतून घ्या. त्यामध्ये थोडे पाणी घालून वाटण काही मिनिटांसाठी झाकून घ्या.
वाटणाला उकळी आले कि त्यामध्ये, आधी खरपूस परतून घेतलेले केळ्याचे काप घालावे.
सर्व पदार्थ एकत्र शिजल्यानंतर, शेवटी ग्रेव्हीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, पॅन खालील गॅस बंद करावा.
या कोकणी पद्धतीच्या व्हेज फिश करीचा आस्वाद, तुम्ही गरम भातासोबत घेऊ शकता.

इन्स्टाग्रामवर @pawar_omkar या अकाउंटने शेअर केलेल्या रेसिपीला आजवर १६.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.