Kothimbir Vadi Marathi Recipe : सणवार असो किंवा एखाद्या दिवशी काहीतरी चटपटीत खावेसे वाटले तर आपण कोथिंबीर वडी बनवण्याचा नक्की बेत आखतो. त्याचप्रमाणे हिवाळ्यात बाजारांमध्ये ताजी, हिरवीगार कोथिंबीर जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे एखादी जास्तीची कोथिंबीर जुडी आपण घरी आणून ठेवतो. कारण – कोथिंबीर वडी खायला कोणी नाही देखील म्हणत नाही. तर आज आपण थोड्या खास टिप्ससह कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची हे पाहणार आहो. चला तर पाहुयात साहित्य आणि कृती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य ( Kothimbir Vadi Ingredient )

  • एक कोथिंबीरची जुडी
  • एक ग्लास चण्याचे पीठ
  • दोन चमचे तिखट मसाला
  • धने-जिरे पावडर
  • एक चमचा मीठ (चवीनुसार)
  • हळद, सुके खोबरे, तेल, पाणी
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • आले लसूण पेस्ट (पाच ते सहा पाकळ्या लसूण)

हेही वाचा…Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी

कृती ( How To Make Kothimbir Vadi )

  • कोथिंबीर निवडून ती स्वच्छ धुवा आणि थोडा वेळ तसंच ठेवून द्या.
  • परातीत चण्याचे पीठ, तेल, गरम मसाला, धने-जिरे पावडर, हळद, तिखट मसाला, मीठ आणि खुशखुशीत होण्यासाठी सुके खोबरे घाला. (टीप : चण्याचे पीठ जाडसर नसेल तर त्यात सुके खोबरे घाला किंवा आवडीनुसार सुद्धा घालू शकता)
  • त्यानंतर कोथिंबीर चिरून घ्या आणि पिठात मिक्स करा आणि लागेल तितकंच पाणी त्यात घाला. (शक्यतो अर्धी वाटी पाणी घाला).
  • पीठ मळून घेतल्यानंतर त्याचा रोल करून घ्या.
  • त्यानंतर कुकरमध्ये, इटलीच्या भांड्यात किंवा मोदकाच्या भांड्यात हे पीठ १५ मिनिटे वाफवून घ्या.
  • नंतर वड्या कापून घ्या.
  • तुमच्या आवडीनुसार शेकून घ्या किंवा तळून घ्या.
  • वड्या शेकून घ्यायच्या असतील तर पॅनमध्ये थोडंसं तेल घ्या आणि त्यात राई-जिरा, कडीपत्ता घाला.
  • अशाप्रकारे तुमच्या कोथिंबीरच्या वड्या तयार.

कोथिंबीर वडी चार दिवस अगदी व्यवस्थित राहू शकतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या व्यक्तींना किंवा ऑफिस, शाळेत जाणाऱ्यांच्या डब्यात सुद्धा तुम्ही ही वडी देऊ शकता.

कोथिंबीरचे सेवन करण्याचे आरोग्यदायी फायदे –

ज्या लोकांना संधिवात, स्नायूंच्या दुखण्याचा त्रास आहे त्यांना कोथिंबीच्या रसामुळे आराम मिळतो. तसेच या रसाच्या नियमित सेवनाने रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. कोथिंबीरमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. त्यामध्ये व्हिटॅमिन ए,सीचा उत्तम स्रोत, याशिवाय फायबर, लोह, मँगनीज, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, फॉस्फरस इत्यादी पोषक तत्त्वेही मुबलक प्रमाणात असतात.