Murmura Ladoo : लहान मुलांना पौष्टीक खायला काय द्यायचं, असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो. जंक फूडच्या आहारी मुलं जाऊ नये म्हणून तुम्ही त्यांना घरीच एकापेक्षा एक पौष्टीक पदार्थ खाऊ घालू शकता. चुरमुऱ्याचे लाडू हा पदार्थ एक चांगला पर्याय आहे. अनेकदा आपण चुरमुऱ्याचे लाडू खरेदी करतो पण तुम्ही हा पदार्थ घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. ही सोपी रेसिपी नोट करा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • चुरमुरे
  • चिक्कीचा गूळ

हेही वाचा : Fluffy Bhature : भटुरे फुलत नाही का? टेन्शन घेऊ नका, या टिप्स फॉलो करा

कृती

  • एका भांड्यामध्ये चिक्कीच्या गूळ घाला आणि गॅसवर ठेवा
  • गूळाचा पाक होवून उकळायला लागला कि लगेच त्यात चुरमुरे घाला
  • मिश्रण थोडे गरम असतानाच लाडू बनवा
  • तुम्ही साधा गुळ पण वापरू शकता पण चिक्कीच्या गुळाचा खमंगपणा अधिक टेस्टी वाटतो.
  • आवडत असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचे तुकडेही तुम्ही त्यात टाकू शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make kurmura or murmura or churmura laddoo at home note down recipe healthy food for children ndj
Show comments