लाल माठात अनेक पोषक गुणधर्म असतात. ए, सी, के या व्हिटॅमिन्सने ही भाजी परिपूर्ण असते. शिवाय यात काल्शियमचं प्रमाणही भरपूर असतं.लाल माठात फायबरचं प्रमाणातही चांगलं असतं. ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. शिवाय या भाजीमुळे रक्तातलं इन्सुलीनचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते.चला तर मग आज लाल माठाची भाजी कशी बनवायची जाणून घेऊयात.

लाल माठ भाजी साहित्य

१ जुडी लाल माठ
३/४ कप कांदा
४/५ पाकळ्या लसूण
३/४ हिरव्या मिरच्या/लाल मिरच्या
१.५ टेबलस्पून तेल
१/२ टिस्पून मीठ, धने, जीरे

लाल माठ भाजी कृती

ही भाजी करण्यासाठी लाल माठ, थोडासा पालक, हिरव्या मिरचीचे तुकडे, २ वाळलेल्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, हळद, तेल, मोहरी, धने- जीरे पुड असे साहित्य घेतले.

सगळ्यात आधी तेलाची खमंग फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर लसूण, मिरची आणि कांदा टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यात वाळलेल्या लाल मिरचीचे तुकडे टाका.

आता कढईत माठ आणि पालक टाका. चवीनुसार मीठ आणि धने- जीरे पूड टाकून भाजीला चांगली वाफ येऊ द्या.

हेही वाचा >> खान्देशी पध्दतीचं झणझणीत चवदार कोंबडी बेसन; झक्कास होईल बेत

वाफ आली की माठाची खमंग भाजी झाली तयार. भाजी तयार आहे भाकरी बरोबर छान लागते