Chapati Sandwich Recipe: चपाती हा असा पदार्थ आहे जो आपल्याकडे जवळपास प्रत्येक घरामध्ये तयार केला जातो. सकाळ, दुपार, रात्री तिन्ही वेळेच्या आहारात चपातीचा समावेश हा आर्वजून केला जातो. अशावेळी कित्येकदा चपात्या शिल्लक राहतात. मग इच्छा नसतानाही शिळ्या चपात्या टाकून द्याव्या लागतात. शिळी चपाती टाकून देण्याऐवजी तुम्ही त्यापासून काही पदार्थ तयार करू शकता तेही झटपट. या आधी आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या चपातीपासून समोसा आणि पिझ्झा कसा तयार करायाचा हे सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला उरलेल्या चपातीचे सँडविच कसे तयार करावे हे सांगणार आहोत. तुम्ही येथे व्हिडिओ पाहून स्वादिष्ट चपाती सँडविच तयार करू शकता.

सँडविच असा पदार्थ आहे जो अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. मैद्यापासून तयार झालेले सँडविच आरोग्याला खूप नुकसान पोहचवते त्यामुळे आम्ही तुम्हाला चपातीपासून सँडविच कसे तयार करावे हे सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही फक्त शिळी चपाती पुन्हा वापरणार नाही तर झटपट स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता देखील तयार करणार आहात. चपाती सँडविच रेसिपी एका इस्टाग्राम युजरने (@auraartofhealthyliving) शेअर केली आहे.

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

चला जाणून घेऊ या, चपाती सँडविच तयार करण्याची रेसिपी.

चपाती सँडविच तयार करण्यासाठी साहित्य

उकडलेला काबुली चणा, १ चमचा तेल, अर्धा चमचा लाल मिर्टी पावडर, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जीरा पावडर, हिरवी चटणी, टोमॅटो कॅचअप, चीज स्लाईस, एक चपाती, मीठ आवश्यकतेनुसार, गोल आकारात कापलेले काद्यांचे काप, टोमॅटो, आणि काकडी.

\

हेही वाचा : घरीच तयार करा चटपटीत दही पापडी चाट; जाणून घ्या रेसिपी

चपाती सँडविच तयार करण्याची कृती

रोटी सँडविच करण्यासाठी प्रथम सँडविचमध्ये भरण्यासाठी मिश्रण तयार करा. एक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल टाकून उकडलेला काबूली चणा टाका. काही वेळ परतून त्यात वरील सर्व मसाले टाका आणि चांगले परतून घ्या. मसाला सगळीकडून चण्याला लागेपर्यंत २ मिनिटं परतून घ्या आणि गॅस बंद करा. आता चणा वाटी किंवा काट्याच्या साहाय्याने दाबून घ्या.

उरलेल्या चपातीवर एका बाजूला (चतकोर भागावर) हिरवी चटणी लावून घ्या. त्यामध्ये एका बाजूला चण्याचे मिश्रण भरा, त्यानंतर एका बाजूला कांदा टोमॅटो, आणि एका बाजूला चीज घाला.चपातीच्या एका टोकाला चिरा मारा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपाती दूमडून त्रिकोणी तयार करा.

हेही वाचा : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये बनवा टेस्टी ओट्स थेपला, जाणून घ्या सोपी रेसिपी

तव्यावर चपाती सँडविच चांगले खरपूस भाजून घ्या आणि सॉस सोबत खा.

Story img Loader