Kothimbir Vadi Recipe: स्वयंपाकघरात कोथिंबिरीला महत्वाचे स्थान आहे. स्वयंपाकघरात जेवण करताना एखाद्या पदार्थाची लज्जत वाढवण्याचे काम ही कोथिंबिरीचं करते. भाजी, आमटी, चटणी, कढी, अन्य कुठलाही तिखट पदार्थ, कोथिंबिरीशिवाय बनवला जातच नाही. फक्त गोडाचे पदार्थ बनवताना मात्र तिला थोडा आराम असतो. तर आपण एवढ्यावरच थांबत नाही तर तर कोथिंबीर चिरून तिच्या भजी किंवा वड्यासुद्धा केल्या जातात. कोथिंबीर वडी ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना? तर चला आज अनोख्या स्टाईलमध्ये कोथिंबीर वडी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ कोथिंबीर वडी बनवण्यासाठी काय साहित्य लागेल चला पाहू…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

१. एक कप बेसन (१०० ग्रॅम)
२. १/४ कप दही
३. १ आणि १/२ कप पाणी
४. मीठ आणि १/४ चमचा हळद
५. एक चमचा तेल
६. १/४ चमचा हिंग
७. एक चमचा तीळ
८. आलं
९. हिरवी मिरची
१०. लसूण पेस्ट
११. १ कप चिरलेली कोथिंबीर

हेही वाचा…Sweet Corn Dhokla: एक कप रवा, दही घालून करा ‘मक्याचा ढोकळा’; फक्त १५ मिनिटांत होईल तयार; रेसिपी लिहून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

१. एका भांड्यात एक कप बेसन घ्या.
२. त्यात मीठ, हळद, पाणी, दही घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
३. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घाला त्यात हिंग, तीळ, आलं, लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि तयार केलेलं मिश्रण त्यात टाका.
४. गुठळ्या होऊ नये किंवा मिश्रण भांड्याला चिकटू नयेत म्हणून तुम्हाला ते सतत ढवळावे लागेल.
५. मिश्रण तयार झाल्यावर व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एकदा तपासून पाहा.
६. नंतर त्यात कोथिंबीर घाला.
७. पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
८. एका स्टिलच्या प्लेटमध्ये हे मिश्रण गरम असताना पसरवून घ्या.
९. तीस ते चाळीस मिनिटांत हे सेट होईल.
१०. नंतर त्याचे काप करून घ्या आणि आचेवर सर्व बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळा.
११. अशाप्रकारे तुमची कोथिंबीर वडी तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nehadeepakshah या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही रेसिपी तुमचे वजन कमी करण्यात मदत करेल असे युजरचे म्हणणे आहे. तिने २४ कोथिंबीर वडी बनवल्या आहेत ; ज्यात सुमारे २५ कॅलरी आहेत असे युजरचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make maharashtrian kothimbir vadi in unique style recipe watch viral video and make this evening snack recipe in marathi asp